Apple ही दिग्गज टेक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्रॉडक्ट्स कंपनी लॉन्च करत असते. Apple ने त्यांची वर्ल्ड वाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) २०२३ ची घोषणा केली आहे. हा Apple चा वार्षिक इव्हेंट आहे. या इव्हेंटची तारीख जाहीर झाली आहे. यंदाचा इव्हेंट नेहमीपेक्षा मोठा आणि नेत्रदीपक असेल असे Apple चे वर्ल्डवाईड डेव्हलपर्स रिलेशन्सचे उपाध्यक्ष सुसान प्रेस्कॉट यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अ‍ॅपलचा हा इव्हेंट अगदी थोड्याच दिवसांवर येऊन ठेपला आहे. कंपनीने याची एक लाईनअप शेअर केली आहे. ५ जून रोजी कंपनीचे सीईओ टीम कुक आणि मुख्य अधिकाऱ्यांच्या भाषणाने इव्हेंटची सुरुवात होणार आहे. मुख्य भाषण हे थेट प्रसारित केले जाणार आहे. याबाबतचे वृत्त news18.com ने दिले आहे.

हेही वाचा : Weekly Tech Updates: मायक्रोसॉफ्टने लॉन्च केलेल्या ‘जुगलबंदी’ चॅटबॉटपासून ते रिलायन्स जिओचा फॅमिली रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या टेक क्षेत्रातील ‘या’ महत्त्वाच्या घडामोडी

मिक्स रिअ‍ॅलिटी हेडसेट- Apple आपल्या वर्षातील सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये AR/VR हेडसेट – Reality Pro – ची घोषणा करू शकतो. हा एक प्रीमियम स्टँडअलोन हेडसेट असेल ज्यामध्ये दोन 4K OLED eyepieces असतील. हे कस्टम अ‍ॅपल सिलिकॉनने लेस असू शकतात.

याशिवाय अहवाल सांगतो की, कंपनी नवीन मॅक हार्डवेअर लॉन्च करू शकते. Apple सिलिकॉन मॅक प्रो लॉन्च करू शकते. १५ इंचाचा मॅकबुक एअर यावर्षी Apple च्या इव्हेंटमध्ये लॉन्च केले जाऊ शकते. Apple चा इव्हेंट WWDC २०२३ ५ जून २०२३ ते ९ जून २०२३ या कालावधीत होणार आहे.

या इव्हेंटमध्ये iOS, macOS, iPadOS, watchOS आणि tvOS लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. तसेच Apple चा सर्वात खास असा iOS 17 लॉन्च केला जाऊ शकतो. यामध्ये या वर्षी नवीन अपडेट आणि फिचर दिली जाणार आहेत.

हेही वाचा : चीनची सोशल मीडिया अकाउंट्सविरुद्ध मोठी कारवाई; ‘या’ कारणांमुळे तब्बल १४ लाख पोस्ट केल्या डिलीट

कुठे आणि किती वाजता पाहता येणार इव्हेंट ?

Apple चा इव्हेंट WWDC २०२३ ५ जून २०२३ ते ९ जून २०२३ या कालावधीत होणार आहे. Apple WWDC 2023 कीनोट इव्हेंट ५ जून रोजी रात्री १०.३० IST वाजता लाईव्ह प्रसारित होणार आहे. हा इव्हेंट तुम्ही Apple TV, Apple YouTube पेज आणि Apple इव्हेंट्स पेजवर पाहू शकणार आहात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple wwdc big event 5 to 9 june launch ipados watchos headset macbook air check details live streaming tmb 01