भारतातील शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी एडटेक युनिकॉर्न ‘बायजू’ (Byju’s) ने १००० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या लोकांनी बुधवारी बिझनेस टुडेला याबाबदल सांगितले. कंपनीच्या इंजिनिअरिंग विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने बिझनेस टुडेला सांगितले की, आज सकाळी प्रत्येक टेक टीममध्ये कर्मचाऱ्यांची कपात झाली. माझ्या टीममध्ये देखील अशीच कपात करण्यात आली आहे. एकूण १,००० पेक्षा अधिक कर्मचारी म्हणजेच पूर्ण टीमच्या १५ टक्के लोकांना कामावरून काढण्यात आले आहे.
कंपनीने सर्व फ्रेशर्सना कामावरून काढून टाकले आहे असा दावा तिथून कामावरून काढण्यात आलेल्या एका फ्रेशरने केला आहे. गेल्या वर्ष ऑक्टोबर महिन्यात टेक आणि इंजिनिअरिंग टीममधील ३० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते असे कंपनीतील कर्मचाऱ्याने सांगितले. अंतिम कपातीच्या वेळी ३० टक्क्यांनी इंजिनिअरिंग टीम कमी करण्यात आली. आता यावेळी अतिरिक्त १५ टक्के कपात करण्यात आली आहे.
हेही वाचा : Layoffs News: आर्थिक मंदीचे कारण देत Paypal कंपनी सुद्धा करणार २००० कर्मचाऱ्यांची कपात
या दाव्यांबाबत बिझनेस टुडेने बुधवारी BYJU शी संपर्क साधला. ( ही बातमी त्यांची प्रतिक्रिया आल्यावर अपडेट होईल.) ऑक्टोबरमध्ये ५०,००० सक्षम कर्मचाऱ्यांपैकी २,५०० कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याचे कंपनीने सांगितले. जे प्रमाण कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या ५ टक्के एवढे आहे. कंपनीचे संस्थापक बीजू रवींद्रन यांनी कर्मचाऱ्यांच्या कपातीला योग्य म्हटले आहे.त्यांनी सांगितले की कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी हे एक म्हत्वाचे पाऊल आहे.
आर्थिक वर्षे २०२१ मध्ये एडटेकच्या प्रमुखांनी ४,५८९ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे सांगितले. जो भारतीय स्टार्टअपमध्ये नोंदवण्यात आलेला सर्वात मोठ्या प्रमाणातील तोटा आहे. BYJU ने आर्थिक वर्ष २०२१ मध्ये जाहिराती आणि मार्केटिंग म्हणजेच प्रसिद्धीसाठी तब्बल २,५०० कोटी रुपय खर्च केले आहे. तसेच फिफा विश्वचषक स्पर्धेचे अधिकृत प्रायोजक होण्यासाठी कंपनीने $४० दशलक्ष (३३० कोटी रुपये ) खर्च केले होते.
Oppo कडून मालकी हक्क विकत घेतल्यानंतर BYJU कंपनी भारतीय क्रिकेट संघाची मुख्य प्रायोजक झाली. त्यांनी द्विपक्षीय सामन्यांसाठी ४. ६१ कोटी आणि एका सामन्यासाठी १.५१ कोटी रुपये दिले. कंपनीने बीसीसीआयशी ५५ दशलक्ष डॉलर्स (४५४ कोटी रुपये) च्या करार केला होता.