दिवसेंदिवस इंटरनेटचा वापर वाढत चालला आहे. इंटरनेटचा वापर आपल्यासाठी जितका उपयोगी आहे तितकाच तो घातकसुद्धा आहे. इंटरनेटमुळे विविध ऑनलाइन साईट्सच्या मदतीने भारतीय युजर्सची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते आणि नागरिकांना लाखो रुपयांचा फटकासुद्धा बसतो. आता इंटरनेटच्या माध्यमातून भारतीय युजर्सची फसवणूक करणाऱ्यांना केंद्र सरकारने आता कायद्याचा धाक दाखवला आहे.केंद्र सरकार आता १०० चीनच्या वेबसाइट्सवर बंदी घालणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरकारने गुंतवणुकीशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी भारतीयांची फसवणूक करणाऱ्या १०० वेबसाईट्सवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. चीनद्वारे चालवण्यात येणाऱ्या आर्थिक फसवणुकीविरोधात केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. गृह मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला चिनी वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही वर्षांत भारत सरकारने सुमारे २५० चिनी ॲप्स भारताचे संरक्षण, राज्याची सुरक्षा व सार्वजनिक सुव्यवस्था यांच्यासाठी प्रतिकूल असल्याचे कारण देत त्यांच्यावर बंदी घालायचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा…म्युझिक स्ट्रिमिंगची ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना बसवणार घरात ! वाचा किती लोकांच्या जाणार नोकऱ्या…

टिकटॉक, एक्सझेंडर, कॅमस्कॅनर यांसारख्या अनेक चिनी ॲप्सचा भारतात मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता आणि हे ॲप्स लाखो युजर्सनी डाऊनलोडसुद्धा केले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे ॲप्स वापरकर्त्यांचा खासगी डेटा गोळा करतात आणि महत्त्वाच्या परवानगी देण्यास विनंतीसुद्धा करतात. चीन भारतातील सर्व्हर प्राप्त केलेला डेटा अयोग्यरीत्या प्राप्त करून, त्याचा उपयोग करते.

अलीकडे पबजी गेम (PUBG) मोबाईलची बीजीएमआय किंवा बॅटल ग्राउंड्स मोबाईल इंडिया नावाची भारतीय आवृत्ती गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून काढून टाकण्यात आली आहे. पण, यादरम्यान बॅटल रॉयल गेमला एक फायदा झाला. कारण- भारतात एका वर्षात १०० दशलक्ष वापरकर्त्यांनी याचा उपयोग केला; तर आता लवकरच केंद्र सरकार १०० चीन वेबसाइट्सवर बंदी घालून, त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government baned 100 chinese websites targeting indians for investment releated scams asp