सोशल मीडियावर पोस्ट होणाऱ्या चुकीच्या कंटेंटबाबत चीन सरकार अधिक सतर्क झाले आहे. चुकीची माहिती देणाऱ्या, बेकायदेशीर नफाखोरीविरुद्ध दोन महिन्यांच्या चौकशीनंतर चीन सायबरस्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने १.४ दशलक्ष सोशल मिडिया पोस्ट डिलीट म्हणजेच काढून टाकल्या आहेत. सायबर स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ऑफ चायनाने ६७,००० सोशल मीडिया अकाउंट्स बंद केली आहेत. १० मार्च ते २२ मे दरम्यान लाखो पोस्ट काढून टाकण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२१ पासून चीनने आपले सायबरस्पेस क्लीन करण्यासाठी अब्जावधी सोशल मीडिया अकाउंट्सना लक्ष्य केले आहे. CAC कडून WeChat, Douyin आणि Weibo सह लोकप्रिय चिनी सोशल मीडिया अ‍ॅप्स बंद करण्यात आले आहेत. हे अ‍ॅप्स सेल्फ मीडिया या श्रेणीच्या अंतर्गत येतात. जे बातम्या आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात मात्र ते सरकारद्वारे चालवले जात नाही. याबाबतचे वृत्त reuters ने दिले आहे.

हेही वाचा : Weekly Tech Updates: मायक्रोसॉफ्टने लॉन्च केलेल्या ‘जुगलबंदी’ चॅटबॉटपासून ते रिलायन्स जिओचा फॅमिली रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या टेक क्षेत्रातील ‘या’ महत्त्वाच्या घडामोडी

ही अकाउंट्स कम्युनिस्ट पक्ष, सरकार किंवा लष्कराशी संबंधित संवेदनशील किंवा गंभीर अशा स्वरूपाची माहिती सार्वजनिक करत असल्यास त्यांना अनेकदा चौकशी आणि सेन्सॉरशिपचा सामना करावा लागतो. CAC च्या म्हणण्यानुसार, ६७,००० कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या अकाउंट्सपैकी सुमारे ८,००० अकाउंट्स ही खोट्या बातम्या देणे, अफवा किंवा हानिकारक माहिती पसरवणे या करण्यासाठी बंद करण्यात आली आहेत.याशिवाय ९,३०,००० अतिरिक्त अकाउंट्सना किरकोळ दंड करण्यात आले. जसे की, फॉलोअर्स काढून टाकणे, तात्पुरती बंदी घालणे किंवा विशेषाधिकार रद्द करणे.

CAC ने अलीकडेच १,००,००० पेक्षा जास्त अकाउंट्स बंद केली आहेत. ज्यांनी AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने बनावट बातम्यांचे कव्हरेज दिले आहे. सुमारे ४५,००० अकाउंटवर गंभीर मुद्दे उपस्थित केल्यामुळे, बेकायदेशीर कामे केल्यामुळे बंद करण्यात आली आहेत. CAC ने केलेल्या या कारवाईमध्ये १३,००० बनावट लष्करी अकाउंट्सला टार्गेट केले आहे. ज्यांची नावे चायनीज रेड आर्मी कमांड, चायनीज दहशतवादविरोधी फोर्स, स्ट्रॅटेजिक मिसाईल फोर्स होती.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China cyberspace administration deleted 14 lakh social media posts in two month check details tmb 01