OnePlus ही मोबाईल उत्पादक कंपनी असून आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत असते. वन प्लस लवकरच काही नवीन प्रॉडक्ट्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. OnePlus 11 5G, OnePlus 11R 5G, OnePlus Buds Pro 2, OnePlus TV 65 Q2 PRO आणि OnePlus हे भारतात लाँच केले जाणार असल्याचे कंपनीने आधीच सांगितले आहे. आता वन प्लस कंपनी OnePlus Pad लाँच करणार आहे. हे वनप्लसचे पॅड काय असणार आहे , याचे फीचर्स आणि किंमत काय असेल ते आपण सविस्तर जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जाणून घेऊ OnePlus Pad बद्दल

वन प्लसच्या या पॅडबद्दल २०२१ पासूनच काही ना काही माहिती समोर येत आहे. मात्र अजून हे प्रॉडक्ट लाँच झालेले नाही. OnePlus TV 65 Q2 Pro हा भारतातील पहिला वनप्लसचा टॅबलेट असणार आहे. वनप्लसने आगामी टॅबलेटच्या लाँचिंग बद्दल माहिती दिली आहे. मात्र त्याच्या फीचर्स बद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा : OnePlus 11R 5G स्मार्टफोनचे फीचर्स झाले लीक; कंपनीने लाँचिंगची तारीख केली जाहीर

OnePlus ने त्यांच्या अधिकृत मायक्रोसाइटवर प्रोमो फोटो शेअर केला आहे. वनप्लस पॅड हे आकर्षक फीचर्स आणि डिझाईनसह लाँच होण्याची शक्यता आहे. या टॅबलेटच्या मागील बाजूस मध्यभागी कॅमेरा मोड्यूल असू शकते. हा टॅबलेट हिरव्या रंगामध्ये उपलब्ध केला जाणार आहे. तसेच हा टॅबलेट आणखी रंगांमध्ये देखील बाजारात आणला जाऊ शकतो.

OnePlus कंपनी OnePlus 11 5G, OnePlus 11R 5G, OnePlus Buds Pro 2, OnePlus TV 65 Q2 PRO आणि OnePlus Pad हे प्रॉडक्ट्स ७ फेब्रुवारीला लाँच करणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: February seven oneplus company going launch oneplus pad and many other products tmb 01
First published on: 27-01-2023 at 17:27 IST