ब्लूटूथ कॉलिंगच्या जबरदस्त फीचर्ससह भारतात लाँच झाले Fire Boltt Talk Ultra स्मार्टवॉच; जाणून घ्या किंमत

Fire Boltt Talk Ultra Smartwatch : या स्मार्टवॉचमध्ये कोणकोणती फीचर्स आहेत ते आपण जाणून घेऊयात.

Fire Boltt Talk Ultra Smartwatch
Fire Boltt Talk Ultra Smartwatch- संग्रहित छायाचित्र / द इंडियन एक्सप्रेस

Fire Boltt Talk Ultra Smartwatch भारतात लाँच झाले आहे. या नवीन स्मार्टवॉचमध्ये १.३९ इंचाचा एलसीडी डिस्प्ले येतो. तसेच यात अनेक फीचर्स येतात . या स्मार्टवॉचमध्ये कोणकोणती फीचर्स आहेत ते आपण जाणून घेऊयात.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

Fire-Boltt Talk Ultra smartwatch चे फीचर्स

फायर बोल्ट टॉक अल्ट्रा स्मार्टवॉचमध्ये १. ३९ इंचाचा एलसीडी डिस्प्ले येतो. तसेच ब्लूटूथ कॉलिंग येते. ज्यामुळे स्मार्टवॉचमधूनच फोन लावता येतो. तसेच यामध्ये गुगल असिस्टंट आणि सिरी सपोर्ट सारखा एआय व्हॉईस असिस्टंट सपोर्ट देखील आहे. याशिवाय या वॉचमध्ये १२३ स्पोर्ट्समोड देण्यात आले आहेत. ज्यात धावणे , सायकलिंग, स्विमिंग अशा मोड्सचा समावेश आहे. SpO2 मॉनिटरिंग, डायनॅमिक हार्ट रेट ट्रॅकिंग आणि स्लीप मॉनिटरिंग सारखी फीचर्स या वॉचमध्ये देण्यात आली आहेत.

हे वॉच एकदा चार्ज केले की, ७ दिवस त्याची बॅटरी टिकते असे फ्लिपकार्टच्या लिस्टिंगमध्ये सांगण्यात आले आहे. हे वॉच चार्ज होण्यासाठी दोन तासांचा वेळ लागतो. यात १०० पेक्षा जास्त क्लाउड वॉच फेसर्स आणि स्मार्ट UI इंटरफेस देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचचे वजन ८० ग्रॅम इतके आहे.

हेही वाचा : Tech Layoffs: Amazonपासून Microsoft पर्यंत अनेक कंपन्यांकडून नोकरकपात; जाणून घ्या किती होता महिन्याचा पगार ?

Fire Boltt Talk Ultra Smartwatch ची काय असेल किंमत ?

फायर बोल्ट टॉक अल्ट्रा स्मार्टवॉच हे भारतात लाँच करण्यात आले आहे. यामध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. या स्मार्टवॉचची किंमत १,९९९ रुपये इतकी आहे. हे स्मार्टवॉच वापरकर्ते फायरबोल्टच्या वेबसाइट व फ्लिपकार्ट इंडियाच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकणार आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 16:02 IST
Next Story
Tech Layoffs: Amazonपासून Microsoft पर्यंत अनेक कंपन्यांकडून नोकरकपात; जाणून घ्या किती होता महिन्याचा पगार ?
Exit mobile version