Premium

Flipkart Big Billion Days Sale 2023 : गुगलचा ‘हा’ ५२ हजारांचा स्मार्टफोन ८ हजारात खरेदी करण्याची संधी, काय आहे ऑफर?

Google ने Pixel 7 मध्ये नवीन Tensor G2 चिपसेटकचा सपोर्ट दिला आहे.

flipkart 52100 rs discount on google pixel 7
गुगल पिक्सेल ७ मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. (Image Credit-google)

गुगल Pixel 7 हा गुगलने लॉन्च केलेल्या स्मार्टफोन्सपैकी सर्वात चांगला स्मार्टफोन आहे. भारतात Google Pixel 7 ६ ऑक्टोबर २०२२ रोजी लॉन्च करण्यात आला होता. Google ने Pixel 7 मध्ये नवीन Tensor G2 चिपसेट दिला आहे. गुगलचा हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. गुगल पिक्सेल ७ हा आयफोन मॉडेलशी स्पर्धा करते. भारतात गुगल पिक्सेलची विक्री केवळ फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाते. आता लवकरच फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये गुगल पिक्सेल ७ हा फोन कमी किंमतीत उपलब्ध असणार आहे. आता फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये गुगल पिक्सेल ७ किती किंमतीमध्ये खरेदी करता येणार आहे आणि त्यावर कोणकोणत्या ऑफर्स मिळणार आहेत हे जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फीचर्स

Google Pixel 7 मध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सल प्राइमरी आणि १२ मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. Pixel 7 मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १०.८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. गुगलच्या या स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी ४३३५mAh बॅटरी देण्यात आली आहे जी ३०W फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

हेही वाचा : १४ हजारांत घरी आणा फुल ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, ‘या’ ठिकाणी खरेदी करता येणार

गुगल पिक्सेल ७ मध्ये ६.३ इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळतो. या स्मार्टफोनमध्ये Tensor G2 चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज वापरकर्त्यांना मिळणार आहे. फ्लिपकार्टने बिग बिलियन डेज सेलमध्ये गुगल पिक्सेल ७ वर मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल आधीच खुलासा केला आहे. फ्लिपकार्टवर गुगल पिक्सेल ७ वर ५२,१०० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटमुळे खरेदीदारांना गुगल पिक्सेल ७ केवळ ७,८९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

सध्या गुगल पिक्सेल ७ फ्लिपकार्टवर ४१,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. १८ हजार रुपयांच्या किंमतीच्या कपातीसह फ्लिपकार्ट तुम्ही वापरलेल्या स्मार्टफोनच्या बदल्यात २,५०० रुपयांच्या विशेष डिस्काउंटसह ३३,१०० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. म्हणजेच तुम्ही गुगल पिक्सेल ७ केवळ ८,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय ICICI बँक डेबिट आणि कार्डच्या ईएमआय व्यवहारावर १ हजारांचा डिस्काउंट मिळवू शकता. यामुळे गुगल पिक्सेल ७ ची किंमत ७,८९९ रुपये इतकी झाली आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Flipkart big billion days sale google pixel 7 discount on 52100 rs and buy only 7899 rs check details tmb 01

First published on: 27-09-2023 at 15:09 IST
Next Story
Lava ने भारतात लॉन्च केला ‘हा’ स्वस्त फोन; ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मिळणार…