Flipkart ही एक ई-कॉमर्स साईट आहे. यावरून तुम्ही तुम्हाला हव्या त्या गोष्टींची खरेदी करू शकता. तसेच ऑनलाईन स्वरूपात वस्तूंची खरेदी केल्यास तुम्हाला त्यावर डिस्काउंट देखील मिळतो. या साईट्स आपल्या ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर्स किंवा सेल आणत असतात. असाच एक सेल फ्लिपकार्ट घेऊन आले आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात. फ्लिपकार्टने त्यांच्या बिग बिलियन डेज २०२३ (Big Billion Days 2023) ची घोषणा केली आहे.
फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज २०२३ हा सेल १ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक ऑफर आणि डिस्काउंट मिळणार आहे. शेड्युलनुसार, फ्लिपकार्ट १ ऑक्टोबर रोजी आयफोनवर, ३ ऑक्टोबर रोजी सॅमसंगवर आणि ४ ऑक्टोबर रोजी पोको स्मार्टफोन्सवर आणि ऑक्टोबर रोजी Realme वर मिळणाऱ्या डिल्स आणि डिस्काउंटबाबत खुलासा करेल. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.
हेही वाचा : iPhone 15 खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ ठिकाणी सुरू आहेत बेस्ट ऑफर्स; एकदा पाहाच
मागच्या वर्षी आयफोन १२ आणि आयफोन १३ सिरीजवर काही आकर्षक डिल्स ग्राहकांना मिळाल्या होत्या. यावर्षी देखील फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलच्या दरम्यान, आयफोन १३ आणि आयफोन १४ सिरीजवर मागील वर्षी प्रमाणेच काही ऑफर्स मिळण्याची अपेक्षा आहे. फ्लिपकार्टने या सेलचे एक प्रायमरी बॅनर लॉन्च केले आहे. त्यात मोटो एज ४०, रिअलमी ९ प्रो मॅक्स आणि सॅमसंग गॅलॅक्सी S 21 हे स्मार्टफोन्स दाखवण्यात आले आहेत.
फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज २०२३ च्या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सवर ८० टक्के सूट मिळणार आहे. लॅपटॉपवरील डील्स १० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तसेच कीबोर्डची किंमत केवळ ९९ रुपये असणार आहे. टॅबलेटवर ७० टक्क्यांचा डिस्काउंट मिळणार आहे. तसेच इंक टॅंक प्रिंटरवर ६० टक्क्यांचा डिस्काउंट मिळेल. बिग बिलियन डेज २०२३ सेलमध्ये टीव्ही आणि इतर प्रॉडक्ट्सवर देखील डिस्काउंट मिळणार आहे. 4K स्मार्ट टीव्हीवर ७५ टक्के इतका डिस्काउंट मिळणार आहे. तसेच यामध्ये 4K गुगल टीव्हीवर देखील सूट मिळणार आहे. ज्याची किंमत केवळ ९,९९९ रुपयांपासून सुरु होते.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flipkart big billion days sale started 1 october iphone laptop tablets discounts check offers tmb 01