सध्या iPhone 14 हा कंपनीच्या आयफोन लाइनअपमधील सर्वात स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. मात्र हा फोन लवकरच फ्लॅगशिपच्या लिस्टमध्ये येईल. कारण लवकरच Apple iPhone 15 ही सिरीज लॉन्च करणार आहे. आयफोन १५ च्या लॉन्चिंगनंतर आयफोन १४ ची किंमतीमध्ये कपात होईल. मात्र जर का तुम्ही एक चांगला आयफोन खरेदी करू इच्छित असाल तर, फ्लिपकार्टच्या Big Saving Days सेलच्या आधी आयफोन १४ स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. ही ऑफर फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी उद्यापासून सुरु होणार आहे.

आयफोन १४ हा सध्या उपलब्ध असलेल्या फ्लॅगशिप लाइनअप मधील व्हॅनिला फोन आहे ज्यात आयफोन १४ प्लस, आयफोन १४ प्रो, आयफोन १४ प्रो मॅक्स चा समावेश आहे. आयफोन १४ मध्ये आयफोन १३ प्रमाणेच चिपसेटचा सपोर्ट मिळतो. तसेच आयफोन १३ प्रमाणेच यात नॉचसह ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळतो. ज्यात व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. रिअर कॅमेरा सेटअपमध्ये १२ मेगापिक्सल सेन्सरसह ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

हेही वाचा : Meta चा मोठा निर्णय! ‘या’ देशामध्ये फेसबुक-इन्स्टाग्रामवर वाचता येणार नाहीत बातम्या, नेमके प्रकरण काय?

आयफोन १४ हा फ्लिपकार्टच्या Big Saving Days सेलच्या आधी २६,३९९ रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. आयफोन १४ सध्या कंपनीच्या अधिकृत स्टोअरवर १०,९०१ रुपयांच्या सूटसह ६८,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय खरेदीदारांना HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या EMI व्यवहारांवर ४ हजार रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. यामुळे या फोनची किंमत ६४,९९९ रुपये इतकी झाली. याशिवाय तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात फ्लिपकार्ट ३८,६०० रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. म्हणजेच सर्व बँक ऑफर्स आणि डिस्काउंटनंतर आयफोन १४ हा ४३,६०० रुपयांच्या सवलतीनंतर २६,३९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

iPhone 15 या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतीक्षित असा स्मार्टफोन आहे. iPhone 15 सिरीज या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता आहे. आयफोन १५ सिरीजमध्ये iPhone 15, iPhone 15 Pro, iPhone 15 Plus आणि iPhone 15 Pro Max चा समावेश असण्याची शक्यता आहे.