Flipkart Tablet Premier League 2025 : फ्लिपकार्ट २० फेब्रुवारीपासून ‘फ्लिपकार्ट टॅबलेट  प्रीमियर लीग २०२५’ (Flipkart Tablet Premier League 2025) सुरू करणार आहे. यामध्ये टॅब्लेटवर आकर्षक ऑफर असणार आहेत. फ्लिपकार्ट टॅबलेट प्रीमियर लीग २०२५ मध्ये सॅमसंग (Samsung), लेनोवो (Lenovo), ॲपल (Apple), रिअलमी (Realme), वनप्लस (OnePlus), रेडमी (Redmi), एमआय (Mi), पोको (POCO) आणि इन्फिनिक्स (Infinix) या लोकप्रिय ब्रँडवर सूट मिळणार आहे. ग्राहकांना मर्यादित काळासाठी सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॅब्लेटवर ५० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. याशिवाय, ग्राहकांना फोलिओ कव्हर्स आणि कीबोर्ड यांसारख्या टॅबलेट ॲक्सेसरीजवर कपात, एक्स्चेंज ऑफर आणि आकर्षक डीलसुद्धा मिळणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फ्लिपकार्ट टॅबलेट प्रीमियर लीग २०२५ (Flipkart Tablet Premier League 2025) दरम्यान कोणत्या कंपनीच्या टॅबलेटवर किती सूट देण्यात आली आहे, चला पाहू…

  • सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस ९ मध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन २ प्रोसेसर आणि एस-पेन ३९ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होईल.
  • लेनोवो टॅब प्लस ११.५ इंच डिस्प्ले आणि Octa JBL स्पीकर्ससह १३ हजार ७४९ रुपयांपासून सुरू होईल.
  • ॲपल आयपॅड 10th Gen चा १०.९ इंचाचा डिस्प्ले आणि ए १४ बायोनिक चिप २८ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होईल.
  • वनप्लस पॅड गो ११.३५ इंच आय-केअर डिस्प्ले आणि डॉल्बी ॲटमॉस साउंडसह, आता फक्त १५ हजार ७४९ रुपये.
  • रिअलमी पॅड २ लाईट, ११ इंच स्क्रीन आणि ४ जी सपोर्ट १० हजार ७९९ रुपये.
  • याव्यतिरिक्त ग्राहकांना टाइम्स प्राइम सबस्क्रिप्शन ज्याची किंमत साधारणपणे १ हजार २९९ रुपये ते फक्त ६९९ रुपयांमध्ये मिळेल.

फ्लिपकार्ट ग्राहकांना एक्स्चेंज ऑफरमध्ये जुना टॅबलेट देऊन नवीन डिव्हाइस अधिक स्वस्तात घेण्याची संधी देत आहेत. याशिवाय नो कॉस्ट ईएमआय आणि बँक ऑफर्समुळे प्रीमियम टॅबलेट घेणे आणखीन सोपे होईल. तर अशा ऑफर्स ‘फ्लिपकार्ट टॅबलेट प्रीमियर लीग २०२५’ (Flipkart Tablet Premier League 2025) मध्ये असणार आहेत.

याव्यतिरिक्त २५६ जीबी स्टोरेजसह सॅमसंग गॅलॅक्सी एस २४ एफई ५९ हजार ९९९ रुपयांमध्ये फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तेही २५ टक्के डिस्काउंटसह. यामुळे सॅमसंग गॅलॅक्सी एस २४ एफई तुम्हाला ४४ हजार ९९९ रुपयांपर्यंत खरेदी करता येऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला १५ हजार रुपयांची प्रभावी बचत करता येईल. तुम्ही बँकेच्या ऑफरचा फायदा घेतल्यास, हा स्मार्टफोन आणखी चांगल्या डिलसह खरेदी करता येऊ शकतो. सध्या, फ्लिपकार्ट एक्सीस बँक क्रेडिट कार्ड्सह केलेल्या खरेदीसाठी ५ टक्के कॅशबॅक ऑफर करत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flipkart tablet premier league 2025 starts on february 20 discounts of up to 50 percent on best selling tablets asp