Gemini mobile app in India: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ६ डिसेंबर २०२३ रोजी एक्स (ट्विटर) अकाउंटवरून एक व्हिडीओ आणि एक पोस्ट शेअर करून आपले नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल लाँच केल्याची घोषणा केली होती. एआय टूल्स एखादी वस्तू किंवा गोष्ट माणसांप्रमाणे समजवून सांगण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे.जेमिनी हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल आहे जे समजून घेणे, तर्क करणे, कोडिंग आणि नियोजन यांसारख्या गोष्टी करण्यात मदत तर विद्यार्थ्यांपासून ते जिज्ञासू लोकांपर्यंत लोकांना दैनंदिन जीवनात मदत करण्यासाठी इतर मॉडेल्सपेक्षा जास्त चांगले काम करतो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेमिनी मोबाईल ॲप भारतात लाँच :

तर आता हे पाहता गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. सुंदर पिचाई भारतात जेमिनी मोबाईल ॲप लाँच करत आहेत ; जे इंग्रजीसह नऊ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. या स्थानिक भाषांना Gemini Advanced मध्ये जोडलं जाणार आहे. याचबरोबर Gemini Advanced मधील नवीन फीचर्स जसे की, डेटा विश्लेषण, फाईल अपलोड असे फीचर्स तर गूगल मेसेजमध्ये जेमिनी बरोबर इंग्रजीमध्ये चॅट करण्याची सुविधा लाँच करत असल्याची घोषणा आज त्यांनी एक्स (ट्विटर) अकाउंटवरून केली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे ट्विट एकदा तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…रिझ्युमे बनवून देणार, झटपट नोकरी शोधणार; LinkedIn च्या नवीन AI टूल्सचा ‘असा’ वापर होणार

पोस्ट नक्की बघा…

जेमिनी मोबाईल ॲप इंग्रजीसह हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, ‘मराठी’, तमिळ, तेलगू आणि उर्दू या नऊ भारतीय भाषांना सपोर्ट करणार आहे. एखादी रेसिपी बनवायची असेल, सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी कॅप्शन हवं असेल तेव्हा हा ॲप तुम्हाला टाइप करण्याची, बोलण्याची किंवा इमेज जोडण्याची परवानगी देईल. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या भाषेनुसार AI मदत करणार आहे. हे गुगलच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

युजर्स कसा करू शकतील जेमिनी ॲपचा उपयोग?

Android वर जेमिनी ॲक्सेस करण्यासाठी, Gemini ॲप डाउनलोड करा. त्यानंतर तुम्ही कॉर्नर स्वाइप करून, फोनवरील पॉवर बटण दाबून किंवा “Hey Google” बोलून जेमिनी वापरू शकता. तसेच Google असिस्टंटमध्ये तुम्हाला आवडलेली अनेक व्हॉइस फीचर्स जेमिनी ॲपद्वारे उपलब्ध असतील. टायमर सेट करणे, कॉल करणे आणि रिमाइंडर्स (reminders) सेट करणे आदी अनेक काम जेमिनी एआय द्वारे केली जातील.

फीचर्स बद्दल जाणून घेऊ सविस्तर –

डॉक्युमेंट अपलोड (Document Uploads) – १,५०० पानाचे मोठे डॉक्युमेंट अपलोड करा किंवा १०० ईमेल सारांशित करा. जेमिनी ॲडव्हान्स्ड क्विक समरी (quick summaries) पर्सनल फीडबॅक (personalized feedback) तसेच एखादी कृती करण्यायोग्य अंतर्दृष्टी प्रदान करू शकते. यामुळे तुमचा वेळ वाचेल. जेमिनी पाळीव प्राण्यांची पॉलिसी शोधण्यात सुद्धा तुमची मदत करेल.

डेटा विश्लेषण (Data Analysis) – तुमच्या स्प्रेडशीट्स (Google Sheets, CSVs, Excel) अपलोड करून डेटा विश्लेषण कार्ये जेमिनी सहज हाताळेल. जेमिनी ॲडव्हान्स्ड आता तुमचा डेटा क्लीन करू शकते, एक्सप्लोर करू शकते, विश्लेषण करून व्हिज्युअलाइज सुद्धा करू शकते. तुमच्या स्प्रेडशीट्सचे परस्पर चार्ट आणि आलेखांमध्ये रूपांतर करू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या खर्चाचे पॅटर्न शोधत असाल किंवा तुमच्या छोट्या व्यवसायाची सरासरी, एकूण विक्री, तुमचा वैयक्तिक डेटा विश्लेषक आदी अनेक गोष्टींसाठी जेमिनी ॲडव्हान्स्डचा तुम्हाला हातभार लावेल.

गूगल मेसेजमध्ये जेमिनी –

तुमच्या फोनवर गूगल मेसेजमध्ये जेमिनी देखील सादर करत आहोत. मेसेज ड्राफ्ट करणे, एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन करणे शक्य होणार आहे.आम्ही निवडक डिव्हाइसेसवर सुरुवात करण्यासाठी Google Messages मध्ये Gemini ला इंग्रजीत आणणार आहोत. तर अशाप्रकारे जेमिनी मोबाईल ॲप युजर्सची मदत करणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gemini mobile app in india available in marathi english and 8 indian languages new features gemini in google messages and many more asp