Premium

गुगल क्रोम Vs मायक्रोसॉफ्ट एज! कोण आहे बेस्ट ? ‘ही’ तीन कारणं पाहा…

गुगल क्रोम मायक्रोसॉफ्ट एजपेक्षा का बेस्ट आहे जाणून घेऊ.

Google Chrome or Microsoft Edge which web browser are best read these three reasons
(सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टिम ) गुगल क्रोम Vs मायक्रोसॉफ्ट एज! कोण आहे बेस्ट ?

इंटरनेट ब्राउझर ही युजर्ससाठी अत्यंत महत्त्वाची साधने आहेत, तर सगळ्यात वेब ब्राउझरच्या क्षेत्रात दोन नावं अगदीच प्रसिद्ध आहेत; ती म्हणजे ‘गुगल क्रोम (Google Chrome) आणि Microsoft Edge (मायक्रोसॉफ्ट एज)’. गुगल सर्च इंजिन म्हणून ओळखले जाते. तुम्ही अनेक गोष्टी गुगलद्वारे सर्च करता आणि विविध विषयांची माहिती मिळवता. तर मायक्रोसॉफ्ट एज, गुगल क्रोम वेब ब्राउझर हे वापरण्यापूर्वी ते आपल्यासाठी योग्य आहेत का हे लक्षात घेणं आणि त्यांचे फिचर जाणून घेणेसुद्धा महत्त्वाचे आहे. तर आज आम्ही तुम्हाला वेब ब्राउझरपेक्षा गुगल क्रोम सगळ्यात बेस्ट का आहे याची तीन मुख्य कारणं सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर गुगल क्रोम मायक्रोसॉफ्ट एजपेक्षा का बेस्ट आहे हे जाणून घेऊ.

१. एक्स्टेंशन लायब्ररी (extension library):

गुगल क्रोमचे एक निश्चित वैशिष्ट्य त्यांच्या एक्स्टेंशन लायब्ररीमध्ये आहे. गुगल क्रोममध्ये दोन लाखांपेक्षा जास्त एक्स्टेंशन उपलब्ध आहे, जो विविध प्रकारच्या वापरकर्त्यांना पुरवण्यात येतो. ज्यामध्ये ॲड ब्लॉकिंग, पासवर्ड, विविध भाषा शिकणे आदी गोष्टींचा समावेश आहे . याउलट, मायक्रोसॉफ्ट एजची एक्स्टेंशन लायब्ररी तुलनेत थोडी फिकट आहे. क्रोममध्ये उपलब्ध असलेल्या एक्स्टेंशनचा काही अंशच ऑफर करते. यामुळेच काही वापरकर्ते मायक्रोसॉफ्ट एजपेक्षा गुगलला जास्त प्राधान्य देतात.

२. गुगल डिजिटल इकोसिस्टमसह बरोबर सिमलेस इंटिग्रेशन:

गुगल वापरकर्त्यांना सहज आणि एकत्रित अनुभव प्रदान करते. युजर्सना जीमेल (Gmail), गुगल ड्राईव्ह (Google Drive) किंवा इतर गुगल खाती अ‍ॅक्सेस करणे, गुगलवर भाषांतर आदी विविध गोष्टींसाठी वापरकर्त्यांना मदत करते. तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट एज या सेवांमध्ये वापरकर्त्यांना सेवा पुरवण्यात कमी पडतात. तसेच मायक्रोसॉफ्ट एज वापरकर्त्यांच्या वर्क फ्लोमध्ये व्यत्यय आणतात आणि वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये नेव्हीगेट करतात.

हेही वाचा…१ डिसेंबरपासून बदलणार सिम कार्डखरेदीचे नियम! वाचा ‘हे’ पाच महत्त्वाचे मुद्दे…

३. सिक्युरिटी आणि अपडेट :

गुगल क्रोम कंपनी युजर्सच्या सुरक्षिततेसाठी क्रोम ब्राउझरवर विकसित होणाऱ्या ऑनलाइन धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी नियमितपणे अपडेट आणि पॅच जारी करत असते. त्यामुळे सुरक्षिततेसाठी क्रोम हे एक सुरक्षित आणि विश्वासू व्यासपीठ राहील. तसेच मायक्रोसॉफ्ट एज युजर्सनादेखील नियमित अपडेट मिळत असतात. पण, गुगल क्रोमच्या तुलनेत थोडं कमी अपडेट मिळतात. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट एज युजर्सचा डेटा आणि प्रायव्हसी संदर्भात असुरक्षितता वाढू शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Google chrome or microsoft edge which web browser are best read these three reasons asp

First published on: 29-11-2023 at 13:55 IST
Next Story
तुमच्या मोबाईलमध्ये अचानक LTE किंवा VoLTE का लिहिलेलं दिसतं माहितीये? कारण वाचून व्हाल अवाक्…