Google Layoffs: गुगलच्या अडचणींमध्ये वाढ, कमी पगाराविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन| google employees protested near offices california new york against less salary | Loksatta

Google Layoffs: गुगलच्या अडचणींमध्ये वाढ, कमी पगाराविरोधात कर्मचाऱ्यांनी उचलले ‘हे’ पाऊल

दिग्गज टेक कंपन्या जागतिक मंदीचे कारण देत अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत.

google do not pay money employees
Google – संग्रहित छायाचित्र / द इंडियन एक्सप्रेस

सध्या जगभरात दिग्गज टेक कंपन्यांसह विविध क्षेत्रातील कंपन्या जागतिक मंदीचे कारण देत अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. यातच Google या दिग्गज टेक कंपनीने १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली. मात्र कंपनीच्या अडचणी काही प्रमाणात वाढताना दिसत आहेत. कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी उपठेकेदार कामगारांच्या कामाच्या स्थितीकडे कंपनीचे लक्ष वेधून घेण्यासाठी तसेच कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्कमध्ये या सर्व कामगारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आंदोलन केले.

बुधवारी कॅलिफोर्नियामधील माउंटन व्ह्यू येथील गुगलच्या मुख्यालयात एक रॅली निघाली तर दुसरी रॅली न्यूयॉर्क शहरातील गुगलच्या कार्पोरेट ऑफिसजवळ काढण्यात आली. अल्फाबेट इंक. चौथ्या तिमाहीमधील रिझल्ट दिल्यानंतर सुमारे ५० कर्मचाऱ्यांनी न्यूयॉर्कमधील नाइनथ अव्हेन्यूवरील गुगल स्टोअरच्या बाहेर आंदोलन केले.

हेही वाचा : Google Layoffs: Google ने कामावरून काढून टाकताच महिला झाली भावूक; म्हणाली, “बॉसला फोन केला अन्…”

कंपनीने चौथ्या तिमाहीमध्ये $१३.६ अब्ज इतका प्रॉफिट मिळवला आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर अल्बर्टा देवोर म्हणाले की , Google ने आपल्या १२,००० सहकर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे तर्क फेटाळले आहेत. एक गोष्ट स्पष्ट आहे की, कंपनी टाळेबंदीतून जी बचत करत आहे ते मागच्या तिमाहीत स्टॉक बायबॅकवर खर्च करण्यात आलेल्या अब्जावधी रुपयांच्या तुलनेत काहीच नाही आहे. या काढण्यात आलेल्या दोन्ही रॅलीचे आयोजन हे अल्फाबेट वर्कर्स युनियनने केले होते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 12:30 IST
Next Story
FASTag चा रिचार्ज करताय तर सावधान! एका व्यक्तीच्या अकाउंटमधून उडाले १ लाख रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण