आज Google चा वर्षातील सर्वात मोठा i/o इव्हेंट होणार आहे. यंदाचा गुगलचा हा इव्हेंट एकदम खास असणार आहे. कारण कंपनी यामध्ये पहिल्या पिक्सल फोल्ड हा पहिला फोल्डिंग स्मार्टफोन लॅान्च करणार आहे. तसेच तुम्हाला यामध्ये Pixel 7a चे अधिकृत लॉन्चिंग पाहायला मिळणार आहे. जो लवकरच भारतात देखील येणार आहे.
तसेच या इव्हेंटमध्ये गुगल त्याच्या AI चॅटबॉट Bard बद्दल माहिती देणार आहे. तसेच या इव्हेंटची सुरुवात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या भाषणाने होणार आहे. सेच याशिवाय Android 14 चे ऑफिशियल इंट्रोडक्शन, पिक्सल टॅबलेटसह Pixel 8 सिरीज देखील लॉन्च करू शकते. तर हा इव्हेंट तुम्ही Live कुठे, कसा आणि केव्हा पाहू शकता त्याबद्दल जाणून घेऊयात.
हेही वाचा : युजर्ससाठी आनंदाची बातमी! Twitter लवकरच आणणार ‘हे’ जबरदस्त फिचर
Google I/O इव्हेंट २०२३ कधी आणि कुठे पाहता येणार ?
Google I/O 2023 हा इव्हेंट माउंटन व्ह्यू (कॅलिफोर्निया) मधील शोरलाइन अॅम्फीथिएटरमध्ये होणार आहे. म्हणजेच हा इव्हेंट यंदा भौतिकरित्या होणार आहे. मात्र फॅन्स मुख्य भाषण मोफत लाईव्ह पाहू शकणार आहेत. याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हे कंपनीच्या अधिकृत YouTube हँडलवर होणार आहे. Google I/O कीनोट रात्री १०.३० वाजल्यापासून सुरु होणार आहे. त्यानंतर डेव्हलपर केंद्रित कीनोट होणार आहे. गुगल या वर्षी अनेक डिव्हाइसेस लॉन्च करण्याची शक्यता आहे त्यामुळे हा इव्हेंट एका तासापेक्षा अधिक काळ चालू शकतो.
Android 14
गुगल या कार्यक्रमामध्ये अँन्ड्रॉईड १४ ला बीटा टेस्टर्ससाठी लॉन्च करू शकते. काही महिन्यांनी हे सर्व अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी रोलआऊट करण्यात येणार आहे. अँड्रॉइड १४ मध्ये मिळणाऱ्या अनेक नवीन फीचर्सची माहिती या इव्हेंटमध्ये दिली जाणार आहे. ज्यामध्ये सर्वात खास ‘Back Gesture’ हे फिचर असणार आहे.
AI Bard
गुगलच्या या इव्हेंटमध्ये AI bard देखील सादर केले जाणार आहे. कंपनी याबद्दल या इव्हेंटमध्ये अधिकची माहिती वापरकर्त्यांना आणि ग्राहकांना देऊ शकते.
हेही वाचा : युजर्ससाठी आनंदाची बातमी! Twitter लवकरच आणणार ‘हे’ जबरदस्त फिचर
Pixel 7a
Pixel 7a हा मिड-बजेट असणारा स्मार्टफोन कंपनीसाठी गेमचेंजर ठरू शकतो. सध्या या सेगमेंटमध्ये सॅमसंग, ओप्पो आणि वनप्लसचे वर्चस्व पाहायला मिळते. गुगलच्या या फोनची किंमत साधरणतः ४५,००० रुपये असण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये संकीर्ण, बॅटरी आणि कॅमेरा देखील अपग्रेड होऊ शकतो.
Pixel Fold
Pixel Fold या फोल्डेबल फोनमध्ये तुम्हाला ७.६७ इंचाचा स्क्रीन मिळू शकतो. तसेच हा फोन फोल्ड केला असता त्याच्या डिस्प्लेची साईझ ५.७९ इंच होतो. गुगलचा फोल्डेबल फोनचा डिस्प्ले सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या तुलनेत लहान होतो.