CEO Sundar Pichai Reply On Google Meet Worse Than Zoom Statement : लॉकडाउनमध्ये शाळा, कॉलेज, ऑफिस बंद असल्यामुळे ऑफलाइन क्लासेस किंवा मीटिंग अटेंड करण्यासाठी झूम आणि गूगल मीटचा प्रचंड वापर करण्यात आला. हे दोन्ही ॲप्स एकसारखेच असले तरीही त्यांचे फीचर्स मात्र वेगवेगळे आहेत. पण, सध्या झूम आणि गूगल मीटचा एक वेगळाच वाद सुरू आहे. Quora चे सीईओ व सह-संस्थापक ॲडम डी अँजेलो यांनी झूमवरून गूगल मीटवर स्विच करण्याची त्यांची योजना सोडून दिली आहे.
एका आठवड्याच्या चाचणीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्यांना गूगल मीट अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमुळे चांगले आणि वाईट आहे, असे त्यांना आढळून आले. पण, या निष्कर्षामुळे केवळ युजर्सलाच नव्हे, तर गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचेसुद्धा लक्ष वेधून घेतले तेही अवघ्या २५ मिनिटांत.
झूम आणि गूगल मीट (Google Meet Vs Zoom)
ॲडम डी अँजेलो यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट करते लिहिले की, Quora कंपनीने अलीकडेच एका आठवड्यासाठी झूमवरून गूगल मीटवर स्विच करण्याची एक चाचणी घेतली. गूगल मीट ॲप अनेक छोट्या छोट्या गोष्टींसाठी चांगले असले तरीही त्यात एक मोठा दोषसुद्धा आहे ती म्हणजे ऑडिओ क्वालिटी. गूगल मीटमध्ये बॅकग्राऊंडचा आवाज रद्द करणे आणि आपलाच आवाज आपल्याला पुन्हा ऐकू येणे आदी समस्या जाणवल्या.
पोस्ट नक्की बघा…
ॲडम डी अँजेलोची एक्स (ट्विटर)ची पोस्ट पाहून अनेक युजर्सही संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्स सहमत आहेत; तर काही युजर्स याला विरोध करताना दिसत आहेत. तर पोस्ट पाहून गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी लगेच, “अरे ॲडम, मला तू सांगितल्याप्रमाणे कोणताच अनुभव आला नाही. @reed खाली दिलेल्या नोट्समध्ये माझ्या माहितीनुसार ते चांगले काम करीत आहेत. आम्ही मूळ कारण समजून घेण्यासाठी आणि त्याचे निराकरण करण्यासाठी मदत करू. फ्लॅग केल्याबद्दल धन्यवाद”, अशी कमेंट केली आहे.