Apple CERT-In Security Alert : CERT-In या भारताच्या सायबर सुरक्षा सिस्टीमने मंगळवारी सर्व अ‍ॅपल उत्पादनांना उच्च तीव्रतेच्या त्रुटींबद्दल इशारा दिला असून, यामध्ये कोणत्याही ठिकाणाहून [रिमोट] मोठ्या प्रमाणावर कोड एक्सिक्युशन अटॅकच्या धोक्याबद्दल सूचना दिली होती.

हा धोका आयओएस, आयपॅड ओएस, मॅक ओएस आणि व्हिजन प्रो हेडसेटच्या व्हिजन ओएसच्या जुन्या व्हर्जनला असल्याचे ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या लेखावरून समजते. वेब आरटीसी आणि कोर मीडियाच्या आउट ऑफ बॉण्ड राईट समस्येमधून कोणत्याही उपकरणावर धोकादायक मॅलेशियस [malicious] कोड चालवण्यास परवानगी मिळते.

हेही वाचा : AI Animal Talk : AI सांगणार प्राण्यांच्या मनात काय चाललंय?, त्यामुळे डॉक्टरांना कशी होईल मदत? जाणून घ्या…

आयफोन [८ आणि त्यानंतरचे], आयपॅड [५ व पुढे] आणि मॅक/लॅपटॉप अशा अपडेटेड नसलेल्या जवळपास सर्व उपकरणांना हा धोका आहे. तसेच व्हिजन प्रो १.१.१ च्या पूर्वीचे व्हिजन ओएस व्हर्जन, जसे की ८/X यांसारखे जुने आयफोन आणि आयपॅड हे जर १६.७.७ या व्हर्जनवर नसल्यास ते देखील संवेदनक्षम असल्याचे समजते.

या समस्येवर उपाय करण्यासाठी अ‍ॅपलने सुरक्षा पॅचेस सोडलेले आहेत. मात्र, त्यासाठी तुमचे सॉफ्टवेअर अपडेटेड असणे आवश्यक आहे. त्यासाठी –
सेटिंगमध्ये जावे – जनरलमध्ये जाऊन तुमचा आयफोन / आयपॅड किंवा तुमच्या सिस्टीम प्राधान्यानुसार, नवीन सुरक्षा देणारे अपडेट मॅकमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे.

तुमच्या माहितीसाठी CERT-In ने प्रभावित झालेल्या सॉफ्टवेअरची यादी पाहा :

१७.४.१ पूर्वीचे अ‍ॅपल सफारी व्हर्जन [मॅकओएस Monterey आणि मॅकओएस Ventura मध्ये उपलब्ध]

१३.६.६. पूर्वीचे अ‍ॅपल मॅकओएस Ventura व्हर्जन

१४.४.१ पूर्वीचे अ‍ॅपल मॅकओएस Sonoma व्हर्जन

१.१.१ पूर्वीचे अ‍ॅपल व्हिजन ओएस व्हर्जन

१७.४.१ पूर्वीचे अ‍ॅपल आयओएस आणि आयपॅड ओस व्हर्जन [आयफोन XS आणि पुढे, आयपॅड प्रो १२.९ इंच २ जनरेशन आणि पुढे, आयपॅड प्रो १०.५ इंच, आयपॅड प्रो ११ इंच १ जनरेशन आणि पुढे, आयपॅड एअर ३ जनरेशन आणि पुढे, आयपॅड ६ जनरेशन आणि पुढे, आयपॅड मिनी ५ जनरेशन आणि पुढे यांमध्ये उपलब्ध]

१६.७.७ पूर्वीचे अ‍ॅपल आयओएस आणि आयपॅडओस व्हर्जन [आयफोन ८, आयफोन ८ प्लस, आयफोन एक्स, आयपॅड ५जनरेशन, आयपॅड प्रो ९.७ इंच आणि आयपॅड प्रो १२.९ इंच १ जनरेशन यांमध्ये उपलब्ध]

हेही वाचा : आत Google map सुद्धा वापरणार AI! पाहा अॅपमधील ३ बदल; जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स….

मात्र, याचा धोका केवळ अ‍ॅपल उपकरणांना नसून अँड्रॉइडलादेखील आहे.

अँड्रॉइडदेखील सुरक्षित नसल्याचे बुधवारी CERT-In ने सांगितले आहे. CERT-In ने अँड्रॉइड १४ या नव्या व्हर्जनमुळे अँड्रॉइड १२ वर या समस्यांचा प्रभाव पडत असून, या धोक्याची तीव्रतादेखील अधिक असल्याचे सांगितले आहे.

अँड्राॅइड फ्रेमवर्क, मीडियाटेक ड्रायव्हर्स, Qualcomm कोड आणि गूगलच्या Widevine DRM यांमध्ये ही त्रुटी असल्याचे समजते. मात्र, सुदैवाने एप्रिल सुरक्षा पॅचचा भाग म्हणून या समस्यांवरदेखील पॅच सोडण्यात आला आहे.

गूगलने त्यांच्या उपकरणांच्या सुरक्षेसाठी सोडलेले अँडरॉईस OEMs पॅच हे सहसा संथ गतीने काम करतात. मात्र, सध्या उद्भवलेली सुरक्षा समस्या ही अतिशय तीव्र धोक्याची असल्याचे CERT-In ने सांगितल्यामुळे एप्रिलमध्ये तुमच्या अँड्रॉइड फोन / टॅबलेटवर अपडेट्स अधिक लवकर येऊ शकतात.

त्यामुळे कोणतेही नवीन अपडेट्स आल्यास त्याची तुम्हाला माहिती असावी, यासाठी तुमच्या उपकरणांवर सतत लक्ष ठेवा.