Infinix Hot 20 Play and Infinix Hot 20 5G launched in india check price | Loksatta

‘INFINIX’ने लाँच केला सर्वात स्वस्त 5G फोन, किंमत १२ हजारांच्या आत, फोनमध्ये ५० एमपी कॅमेरा

इन्फिनिक्सने आपले दोन नवीन ५ जी फोन परडवणाऱ्या किंमतीत लाँच केले आहेत. कंपनीने Infinix Hot 20 Play आणि Infinix Hot 20 5G या दोन फोन्ससह हॉट २० सिरीज सादर केली आहे.

‘INFINIX’ने लाँच केला सर्वात स्वस्त 5G फोन, किंमत १२ हजारांच्या आत, फोनमध्ये ५० एमपी कॅमेरा
(pic credit – jansatta)

इन्फिनिक्सने आपले दोन नवीन ५ जी फोन परडवणाऱ्या किंमतीत लाँच केले आहेत. कंपनीने Infinix Hot 20 Play आणि Infinix Hot 20 5G या दोन फोन्ससह हॉट २० सिरीज सादर केली आहे. दोन्ही फोन्समध्ये नवीन फीचर्स मिळत आहेत. एलईडी फ्लॅश असलेला सेल्फी कॅमेरा, मोठी बॅटरी, हॉट २० ५ जी स्मार्टफोनच्या प्रायमरी कॅमेऱ्यामध्ये ड्युअल एलईडी फ्लॅश आणि हॉट २० प्लेच्या प्रायमरी कॅमेऱ्यामध्ये क्वाड एलईडी फ्लॅश हे नवीन फीचर्स मिळत आहे.

किंमत

इन्फिनिक्स हॉट २० प्ले आणि हॉट २० ५ जी हे अनुक्रमे ८ हजार ९९९ रुपये आणि ११ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळणार आहे. दोन्ही स्मार्टफोन्स ७ जीबी पर्यंतची रॅम ज्यामध्ये ४ जी रॅम आणि ३ जीबी एक्सपांडेबल मेमरी आणि ६४ जीबी स्टोअरेज पर्यंत उपलब्ध आहेत. हॉट २० प्ले लुना ब्ल्यू, ऑरोरा ग्रीन आणि रेसिंग ब्लॅक या तीन रंगांमध्ये सादर झाला आहे, तर हॉट २० ५ जी हा स्पेस ब्ल्यू, ब्लास्टर ग्रीन आणि रेसिंग ब्लॅक या तीन रंगांमध्ये सादर झाला आहे.

फीचर्स

Infinix Hot 20 Play मध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १२० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटसह ६.८२ इंच एचडी प्लस होल फ्लुइड गेमिंग डिस्प्ले देण्यात आला आहे. तर Infinix Hot 20 5G मध्ये १२० हर्ट्झ अल्ट्रा हाय रिफ्रेश रेट आणि १८० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट असलेला ६.६ इंच एफएचडी + हायपर व्हिजन गेमिंग डिस्प्ले देण्यात आला आहे. हॉट २० प्लेमध्ये ऑक्टा कोअर जी ३७ गेमिंग प्रोसेसर देण्यात आले आहे, तर हॉट २० ५ जी स्मार्टफोनमध्ये ६ एनएम डायमेन्सिटी ८१० प्रोसेसर देण्यात आले आहे. Infinix Hot 20 5G स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे, तर Infinix Hot 20 Play स्मार्टफोनमध्ये मागे १३ एमपीचा कॅमेरा आणि सेल्फीसाठी ८ एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 09:54 IST
Next Story
आधुनिक गेमींगच्या जनकाला गुगलची अनोखी आदरांजली; कोण होते जेरी लॉसन? जाणून घ्या