Infinix Zero 5G 2023 unveil with 50 mp camera and 8 gb ram | Loksatta

सादर झाला INFINIX ZERO 5G 2023; 8 जीबी रॅम, ५० एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स, जाणून घ्या किंमत

Infinix Zero 5G 2023 स्मार्टफोन ग्राहकांसाठी सादर झाला आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात लाँच झालेल्या इन्फिनिक्स झिरो ५ जी फोनचा हा अपग्रेडेड व्हर्जन आहे.

सादर झाला INFINIX ZERO 5G 2023; 8 जीबी रॅम, ५० एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स, जाणून घ्या किंमत
(pic credit – jansatta)

Infinix Zero 5G 2023 स्मार्टफोन ग्राहकांसाठी सादर झाला आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात लाँच झालेल्या इन्फिनिक्स झिरो ५ जी फोनचा हा अपग्रेडेड व्हर्जन आहे. भारतात हा फोन कधी उपलब्ध होणार याबाबत माहिती नाही. फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

किंमत

Infinix Zero 5G 2023 स्मार्टफोनमध्ये २५६ जीबी इंटरनल स्टोअरेजसह ८ जीबी रॅम देण्यात आली आहे. या फोनची किंमत १९ हजार ४०० रुपये असून तो काळा, केशरी आणि पांढऱ्या रंगांमध्ये मिळेल. भारतात या फोनची किंमत किती असेल याबाबत कंपनीने खुलासा केलेला नाही.

(सॅमसंग, असूसला फुटणार घाम; ९६ जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो ‘हा’ लॅपटॉप)

फीचर्स

Infinix Zero 5G 2023 स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंच फूल एचडी प्लस आयपीएस स्क्रीन मिळत असून त्यात एआरएम माली जी ६८ एमसी ४ जीपीयूसह मीडियाटेक डायमेन्सिटी १०८० ५ जी एमओसी प्रोसेसर देण्यात आले आहे. फोन अँड्रॉइड १२ ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारीत कंपनीच्या एक्सओएस १२ ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो.

इन्फिनिक्स झिरो ५ जी २०२३ स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम देण्यात आली आहे जी इंटरनल स्टोअरेजच्या सहायाने ५ जीबी पर्यंत अजून वाढवता येऊ शकते. फोनमध्ये २५६ जीबी स्टोअरेज देण्यात आली आहे जी मायक्रो एसडी कार्डच्या सहायाने वाढवता येऊ शकते.

(४८,४९९ रुपयांत मिळवू शकता APPLE IPHONE 13, केवळ ‘हे’ करा)

फोनमध्ये सेल्फीसाठी १६ एमपी कॅमेरा देण्यात आला असून मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ एमपीचे दोन सेन्सर देण्यात आले आहेत. फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनसह ३३ वॉट फास्ट चार्जिंग अडाप्टर मिळते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 15:21 IST
Next Story
सॅमसंग, असूसला फुटणार घाम; ९६ जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो ‘हा’ लॅपटॉप