iOS 18 roll out Today : अखेर तो दिवस आला… टेक कंपनी अ‍ॅपल आयफोन युजर्ससाठी आज १६ सप्टेंबर रोजी आयओएस १८ सॉफ्टवेअर अपडेट आणण्यास सुरुवात करणार आहे. भारतीय आयफोन युजर्सना आज रात्री १० वाजून ३० मिनिटांपासून हे अपडेट मिळण्यास सुरुवात होईल. या अपडेटमध्ये युजर्सना होम स्क्रीन कस्टमायझेशन, लॉक स्क्रीन कस्टमायझेशन, कंट्रोल सेंटर कस्टमायझेशन, टेक्स्ट इफेक्ट, लॉक अँड हाइड ॲप्ससह इतर अनेक फीचर्स मिळणार आहेत. पण, या फीचर्सचा अनुभव घेण्यापूर्वी तुम्हाला अपडेटबद्दल काय माहीत असणे आवश्यक आहे ते पहिले जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसं कराल डाउनलोड ?

अपडेट डाउनलोड करण्यासाठी, युजर्सना फक्त सेटिंग्ज>जनरल>सॉफ्टवेअर अपडेट्सवर नेव्हिगेट करावे लागेल आणि स्क्रीनवरील सूचनांचे पालन करावे लागेल. एकदा available झाल्यानंतर, ते त्यांच्या डिव्हाइसवर आयओएस १८ आणण्यासाठी “डाउनलोड आणि इन्स्टाल करा”वर टॅप करू शकतात.

नवीन लाँच करण्यात आलेला iPhone 16 लाइन-अपमध्ये iOS 18 आधीच प्री-इन्स्टॉल केलेला आहे. तसेच iOS 18 अपडेट अ‍ॅपलच्या सर्व डिव्हाइसेसना मिळणार नाही.

तर iOS 18 अ‍ॅपलच्या कोणत्या डिव्हाइसेसमध्ये असणार आहे ते जाणून घेऊ या…

आयफोन १५ सीरिज (१५, १५ प्लस, १५ प्रो आणि १५ प्रो मॅक्स)
आयफोन १४ सीरिज (१४, १४ प्लस, १४ प्रो आणि १४ प्रो मॅक्स)
आयफोन १३ सीरिज (१३, १३ मिनी, १३ प्रो आणि १३ प्रो मॅक्स)
आयफोन १२ सीरिज (१२ १२ मिनी, १२ प्रो आणि १२ प्रो मॅक्स)
आयफोन ११ सीरिज (११, ११ प्रो आणि ११ प्रो मॅक्स)
आयफोन एसई (२ आणि ३ री जनरेशन)

हेही वाचा…Amazon Great Indian Festival 2024: लॅपटॉपवर ४० टक्के, तर ‘या’ स्मार्टफोन्सवर भरघोस सूट; वाचा ‘ही’ यादी; पाच दिवसात सुरु होणार सेल

iOS 18 चा कशाप्रकारे करता येईल उपयोग?

१. ॲप आयकॉन स्विच करा : iOS 18 या नवीन फीचरद्वारे युजर्स ॲप आयकॉन कुठेही स्विच करू शकतात किंवा ठेवू शकतात. ॲप आयकॉन गडद रंगात बनवण्याबरोबरच टेक्स्टशिवाय आयकॉन मोठा करण्याचा पर्यायही दिला जाणार आहे.

२. वाढदिवसासाठी मेसेज करा शेड्युल : iOS 18 अपडेटमध्ये आयफोन युजर्सना मेसेज शेड्युल करण्याचा, तर वेळ सेट केल्यावर, युजर त्यांचा मेसेज लिहून पाठवू शकतील; जो निवडलेल्या वेळी मेसेज समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल.

३. मेसेजला द्या इफेक्ट : युजर्स मेसेजमधील एखाद्या शब्दाला आवडीनुसार सिलेक्ट करून त्याला इफेक्ट देऊ शकतात. Android स्मार्टफोन युजर्सना चांगल्या मेसेजसाठी RCS सपोर्टदेखील मिळेल.

४. ॲप्स लॉक करा : iOS 18 अपडेटनंतर, आयफोन वापरकर्त्यांना ॲप्स लॉक करण्याचा, ॲप्स लपवण्याचा पर्याय देतील. ॲप्स लॉक किंवा लपवण्यासाठी वापरकर्ते फेस आयडी, टच आयडी किंवा पासवर्ड वापरू शकणार आहेत.

५. अपडेटेड फोटो ॲप : अ‍ॅपल iOS 18 मध्ये फोटो ॲप अपडेट करत आहे, ज्यामध्ये अनेक नवीन फीचर्स जोडली जातील. यामध्ये फोटो लायब्ररी एकाच वेळी पाहता येणार आहे. थीमनुसार तुम्ही तुमचे फोटोही पाहू शकणार आहात.

लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी :

स्टोरेज क्लीन करा : नवीन OS अपडेट मोबाइलमध्ये डाउनलोड करण्यापूर्वी iOS 18 च्या इन्स्टॉलेशनसाठी तुमचा फोन क्लीन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे करण्यासाठी न वापरलेले ॲप्स हटविणे आतापासूनच सुरू करा.

तुमचे डिव्हाइस पूर्णपणे चार्ज करा : डाउनलोड करताना समस्या टाळण्यासाठी, तुमचा iPhone पूर्णपणे चार्ज झाला आहे का? आयफोन वाय-फायशी कनेक्ट केलेला आहे का याची खात्री करून घ्या.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ios 18 to start rolling out india today launch time how to download 7 read below list of devices that are eligible for update asp