iQOO ही एक लोकप्रिय मोबाइल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी ती नवनवीन स्मार्टफोन्स बाजारपेठेमध्ये लॉंच करीत असते. त्यात ग्राहकांना नवीन फीचर्स आणि अपडेट्स मिळत असतात. आता कंपनी २२ फेब्रुवारी रोजी भारतात iQOO ची नवीन सीरिज लॉंच करणार आहे. आयक्यूओओ झेड९ (iQoo Z9) असे या स्मार्टफोनचे नाव असणार आहे.
iQoo Z9 लाँचआधी या मोबाईलच्या खास फीचर्सची माहिती समोर आली आहे. तसेच iQoo Z८ च्या सक्सेसमुळे कंपनी iQoo Z9 बरोबर iQoo Z9x मॉडेलदेखील लाँच करण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात येत आहे. तर IQoo Z9 मध्ये काय फीचर्स असणार आहेत ते पाहू.
IQoo Z9 मध्ये हॅण्डसेट ब्ल्यूटूथ ५.३ आणि ५जी कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करील. तसेच यामध्ये ७ जेन ३ एसओसी, १.५के रिझोल्युशनसह ओएलडी पॅनेल व ६००० एमएएच बॅटरी पॅक असणार आहे. आयक्यूओओमध्ये (iQoo Z8) ६.६४ इंचांचा आयपीएस फुल – एचडी प्लस (२४०० इंटू १०८० पिक्सेल) एलसीडी स्क्रीन, मीडिया टेक डायमेन्सिटी ८२०० एसओसी ( 8200 SoC) व ५,००० एमएएच बॅटरी आहे.
हेही वाचा…मोफत जेवण, झोपण्याची सोय… मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा ‘हा’ VIDEO पाहून नेटकरी विचारतायत अर्ज कसा करू?
ऑप्टिक्ससाठी (For optics) फोनच्या ड्युअल रीअर कॅमेरा युनिटमध्ये २ मेगापिक्सेल सेन्सरसह ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी; तर फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सेलचा सेन्सर आहे. iQoo Z8 मध्ये अॅण्ड्रॉइड १३ आधारित ओरिजिन ओएस ३.० आणि १२० डब्ल्यू Wired अल्ट्रा-फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. माहितीनुसार या मॉडेलचे टेक्श्चर, ग्रेडियंट लाईट निळ्या बॅक पॅनेलसह लाँच होईल. दोन्ही फोनमध्ये ओआयएस (OIS) -समर्थित ड्युअल रीअर कॅमेरा युनिट्स आहेत. एका मॉडेलमध्ये वर्तुळाकार कॅमेरा, तर दुसऱ्यामध्ये चौरस आकाराचे कॅमेरा मॉड्युल आहे. अशी या लाँच होणाऱ्या स्मार्टफोनची फीचर्स आहेत.