Made In India AI Robot: २०१० मध्ये प्रदर्शित झालेला “रोबोट’ चित्रपटात रजनीकांत, ऐश्वर्या रॉय यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यावेळी हा चित्रपट सुपरहिट झाला होता. कारण यामध्ये माणसाने बनवलेला अगदी माणसासारखा दिसणारा रोबोट होता ; जो अगदी अभ्यास लक्षात ठेवण्यापासून ते जेवणापर्यंतची सगळी कामे करायचा. तुम्ही पाहिलं असेल की, गेल्या काही दिवसांपासून एआयचा मानवी जगातील हस्तक्षेप वाढला आहे. एआयच्या मदतीने विविध क्षेत्रात नवनवीन संशोधन केले जात आहेत. तर आज एआयच्या मदतीने एका भारतीय कंपनीने मेड इन इंडिया रोबो (Made In India AI Robot) बनवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रहस्ता (Prahasta) असे या रोबोचे नाव आहे. हा रोबो हैदराबादस्थित कंपनीने लाँच केला आहे. तुम्ही या रोबोची झलक पाहिलीत तर याला प्राण्याप्रमाणे चार पाय आहेत. खास म्हणजे पाठीवर एक बंदूक देखील आहे आणि तो एखाद्या प्राण्याप्रमाणे शिड्या सुद्धा चढतो आहे. तुम्ही व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, या इवल्याश्या रोबोटने भारतीय जवान यांना स्वतःच्या पाठीवर उचलून देखील घेतलं आहे. मेड इन इंडिया रोबोची झलक तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.

हेही वाचा…Jio Recharge Plan With OTT Benefits: रिचार्ज प्लॅन्सच्या शुल्कात घट अन् वैधतेत वाढ; ग्राहकांसाठी ओटीटी सबस्क्रिप्शन्सच्या नवीन प्लॅन्सची यादी जाहीर

व्हिडीओ नक्की बघा…

मेड इन इंडिया एआय रोबो (Made In India AI Robot) :

ग्लोबल डिफेन्स मार्केटसाठी कंपनीने हा मेड इन इंडिया एआय रोबो लाँच केला आहे. हा रोबो मिशन, नियोजन , नेव्हिगेशन, धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी 3D भूप्रदेश नकाशे तयार करण्यासाठी जो LiDAR (लाइट डिटेक्शन आणि रेंजिंग) आणि रीइन्फोर्समेंट हे शिक्षण वापरतो. याचबरोबर कंपनीने हॉकी अँटी-ड्रोन कॅमेरा सिस्टीम, बार्बरिक-आरसीडब्ल्यूएस रिमोट-कंट्रोल्ड वेपन स्टेशन देखील लाँच केलं आहे.

झेन टेक्नॉलॉजी, अँटी-ड्रोन टेक्नॉलॉजीज आणि डिफेन्स ट्रेनिंग सोल्युशन प्रोव्हायडर आणि त्यांच्या उपकंपनी एआय ट्युरिंग टेक्नॉलॉजीजच्या यांच्या सहकार्याने ग्लोबल डिफेन्स मार्केटसाठी सोमवारी एआय रोबोट प्रहस्ता सादर केला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Made in india ai powered robot hyderabad based company launches for global market with a suite of new products asp