सध्याच्या काळामध्ये सोशल मीडिया प्रत्येकजण वापरतो. त्यामध्ये WhatsApp, Instagram आणि facebook आणि अन्य Apps आपण वापरत असतो. त्यामध्ये रिल्स तयार करण्यासाठी प्रसिद्ध झालेले एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे इंस्टाग्राम. तुम्ही सर्वजण इन्स्टाग्राम वापरत असाल. काही लोक त्याचे निर्माते असतील आणि काही लोक त्याचे दर्शक असतील. दरम्यान, मेटाने अ‍ॅपवर निर्मात्यांसाठी काही खास फीचर्स आणली आहेत, ज्यामुळे तुमचे काम अधिक सोपे होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर का तुम्ही इंस्टाग्रामवर रिल्स तयार करत असाल तर या बातमीमध्ये तुम्हाला तुमच्या उपयोगाची माहिती मिळणार आहे. रिल्स तयार करणाऱ्यांसाठी कंपनीने अनेक नवीन फीचर्स आणली आहेत. ती फीचर्स कोणती आहेत ते आपण जाणून घेऊयात.

हेही वाचा : सेकंड हॅन्ड Laptop खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ गोष्टी, अन्यथा…

इन्स्टाग्रामवर मेटा कडून पहिले अपडेट म्हणजे आता निर्माते ट्रेंडिंग ऑडिओ आणि हॅशटॅग्सबद्दल सहजपणे शोधण्यात सक्षम होतील. यासोबतच, क्रिएटर ट्रेंडिंग ऑडिओवर किती वेळा रील तयार केला आहे हे देखील पाहण्यास सक्षम असेल. यासाठी कंपनी अ‍ॅपवर एक वेगळा सेक्शन दिले जाणार आहे.

या नवीन फीचरमुळे इंस्टाग्राम क्रिएटर्स सोप्या पद्धतीने रिल्स एडिट करू शकणार आहेत. दरम्यान , जेव्हा-जेव्हा तुम्ही रिल्स इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी सिलेक्ट कराल तेव्हा एडिट विंडोमध्ये तुम्हाला ऑडिओ, स्टिकर, टेक्स्ट या सर्वांसाठी एकच पर्याय मिळणार आहे. त्यामुळे रिल्स एडिट करणे सोपे होणार आहे.

कंपनीने आता रिल्स इनसाईडला देखील अधिक चांगले बनवले आहे. त्यामध्ये दोन नवीन पर्याय जोडण्यात आले आहेत. पहिला एकूण पाहण्याचा वेळ आणि दुसरा सरासरी पाहण्याचा वेळ. रिल्स क्रिएटरला हे दोन्ही आता इंस्टाग्रामवर पाहता येणार आहे. या फीचरमुळे त्याला हे समजायला मदत होणार आहे की, त्याने तयार केलेल्या रिल्स मध्ये लोक कोणत्या प्रकारचे रिओलस जास्त पाहत आहेत.

हेही वाचा : एलॉन मस्क यांची नवी AI कंपनी देणार ChatGPT ला टक्कर; लवकरच लॉन्चबाबत होणार अंतिम घोषणा

इंस्टाग्रामने आणलेल्या नवीन फीचरमध्ये कंटेंट क्रिएट करणाऱ्या क्रिएटर्सना एक नवीन प्रकारचे नोटिफिकेशन मिळणार आहे. आता जो कोणी नवीन वापरकर्ता क्रिएटर्सचे रिल्स पाहून त्याला फॉलो करेल तेव्हा क्रिएटर्सला एका प्रकारचे नोटिफिकेशन मिळणार आहे.

Gift On Reels

गिफ्ट ऑन रिल्स या फीचरचे अपडेट देखील इंस्टाग्रामने आणले आहे. हे फिचर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रांस , मेस्किको, न्यूझीलंड आणि युकेमधील वापरकर्त्यांसाठी लाईव्ह करण्यात आले आहे. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीने कंटेंट क्रिएटरच्या रीलवर गिफ्ट पाठवले तर क्रिएटरला ते बघता येईल आणि क्रिएटरने दिलेल्या हार्ट इमोजीवर रिअ‍ॅक्ट केल्याने त्या व्यक्तीला कळेल की कंटेंट क्रिएटरने त्याची भेट पाहिली आहे.

Instagram ने हे नवीन अपडेट्स जागतिक स्तरावर लॉन्च केले आहेत जे हळूहळू प्रत्येकासाठी रोल आउट करणे सुरू होईल. जरी यापैकी काही फीचर्स कंपनीने भारतात लॉन्च केले नाहीत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meta announces new features for content and reels creators check details tmb 01