Premium

इन्स्टाग्राम अन् मेसेंजर चॅट करणाऱ्यांसाठी वाईट बातमी! Meta बंद करणार ‘हे’ फिचर

आता वापरकर्त्यांना क्रॉस-ॲप चॅटिंग करता येणार नाही…

Meta Ends Cross App Chatting Feature For Instagram and Messanger apps in Middle of december
(फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम/@The Indian Express) इन्स्टाग्राम अन् मेसेंजर चॅट करणाऱ्यांसाठी वाईट बातमी! Meta बंद करणार 'हे' फिचर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फेसबुक आणि इन्स्टाग्राम ॲप युजर्सना अधिक आकर्षक करतात. फोटो पोस्ट करणे, स्टोरीवर गाणं लावणे, रील पाहणे, लाईव्ह जाणे आदी बरेच फिचर वापरकर्त्यांसाठी या ॲप्सवर उपलब्ध आहेत. तसेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला फोटो तुम्ही सेटिंग करून फेसबुकवरदेखील सहज पोस्ट करू शकता. अशा अनेक खास फिचर्समुळे वापरकर्तेसुद्धा या ॲपचा उपयोग करताना दिसून येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेटा कंपनीने तीन वर्षांनी चॅट इंटिग्रेशनची घोषणा केली होती, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम मित्रांना मेसेंजरद्वारे मेसेज पाठवणे सोपे जायचे. पण, आता हा निर्णय मेटाने मागे घेण्याचे ठरवले आहे आणि घोषित केले आहे की, या महिन्यापासून मेसेंजर आणि इन्स्टाग्रामदरम्यान क्रॉस-ॲप चॅटिंगला परवानगी दिली जाणार नाही. वापरकर्त्यांना मेसेंजर आणि इन्स्टाग्रामद्वारे नवीन चॅट सुरू करता येणार नाही. तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी चॅट करायचं असल्यास, तुम्हाला मेसेंजर किंवा फेसबुकवर स्विच करावं लागेल.

२०२० पासून मेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या वापरकर्त्यांना त्यांच्या मित्रांना संदेश पाठवण्यासाठी मेसेंजर किंवा इन्स्टाग्राम डीएम वापरण्याची परवानगी देत होता. इन्स्टाग्राम युजर फेसबुकवरील त्यांच्या मित्रांना इन्स्टाग्राम डीएमच्या मदतीने, तर फेसबुक युजर मेसेंजरवरून इन्स्टाग्रामवरील त्यांच्या मित्रांना मेसेज किंवा कॉल करू शकत होते. हे फिचर वापरण्यासाठी युजर्सना फक्त इन्स्टाग्राम किंवा फेसबुक मेसेंजर सेटिंग्जमधून सेटिंग करणे आवश्यक होते. पण, आता मेटाने घेतलेल्या निर्णयानुसार आता युजर्सना क्रॉस-ॲप चॅटिंग करता येणार नाही.

तसेच हे क्रॉस-ॲप चॅटिंग बंद केल्यावर वापरकर्ते यापुढे फेसुबकवरील युजर्सबरोबर संवाद साधू शकणार नाहीत किंवा इन्स्टाग्रामवरून त्यांच्या फेसबुक मित्रांना कॉल करू शकणार नाहीत. तसेच इन्स्टाग्राम युजर्सना क्रॉस-ॲप चॅटिंग बंद केल्यावर युजर फेसबुक मित्रांसोबतच्या इन्स्टाग्रामद्वारे करण्यात आलेल्या यापूर्वीच्या चॅट्स फक्त वाचण्यापुरत्या मर्यादित असतील. म्हणजेच युजर मित्र-मैत्रिणींना मेसेज करू शकणार नाहीत. पण, त्यांच्या चॅट सुरक्षित राहतील.

हेही वाचा…इन्स्टाग्रामवर एकापेक्षा अधिक अकाऊंट अॅड आणि स्विच कसे करायचे? तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, तर लक्षात घ्या या सोप्या टिप्स…

पण, क्रॉस-ॲप चॅटिंग काढून टाकल्यानंतर फेसबुकवरील तुमचे मित्र-मैत्रीण यापुढे तुम्ही इन्स्टाग्राम ॲपवर ऑनलाईन आहात की नाही, तुम्ही एखादा संदेश पाहिला आहे का, हे पाहू शकणार नाहीत. या व्यतिरिक्त फेसबुक वापरकर्त्यांनी यापूर्वी त्यांच्या मित्रांसह इन्स्टाग्रामद्वारे केलेले कोणतेही चॅट त्यांच्या मेसेंजर इनबॉक्समध्ये दिसणार नाहीत.

मेटाने क्रॉस-ॲप चॅटिंग बंद करण्यामागे कोणतेही विशेष कारण दिलेले नाही. पण, ??? EU ??? च्या डिजिटल मार्केट्स कायद्याचे पालन करण्यासाठी, व्हॉट्सअ‍ॅप आधीपासूनच थर्ड पार्टी चॅटवर काम करत आहे. हे लक्षात घेता, इन्स्टाग्राम आणि मेसेंजरमधील क्रॉस-ॲप चॅटिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Meta ends cross app chatting feature for instagram and messanger apps in middle of december asp

First published on: 06-12-2023 at 14:13 IST
Next Story
येणार नवीन फीचर! फेसबुकवरच नाही तर ‘या’ अ‍ॅपवरसुद्धा होणार व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस शेअर…