हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिल्यानंतर आता Meta ने उचलले मोठे पाऊल; कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये कपात करणार

मेटाने आतापर्यंत तब्बल २१ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

meta cuts employees bonus end of the year
मेटा करणार बोनसमध्ये कपात – संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. ध्या सर्वत्रच कर्मचारी कपातीचे वारे वाहत आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र फेसबुकचची मूळ कंपनी मेटा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मेटाने आतापर्यंत तब्बल २१ हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. मात्र यावरच कंपनी थांबली नाही. तर एका रिपोर्टनुसार कंपनीची नजर आता कर्मचाऱ्यांच्या बोनसवरती आहे. यासाठी कंपनी वर्षभरात दुसऱ्यांदा आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेत आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

मेटा करणार बोनसमध्ये कपात

Wall Street Journal च्या रिपोर्टनुसार, फेसबुकची मूळ कंपनी असणारी मेटा लवकरच आपल्या काही कर्मचाऱ्यांच्या बोनसमध्ये कपात करू शकते. कर्मचाऱ्यांना मिळालेल्या रेटिंगनुसार बोनस कपात करू शकते. ज्या कर्मचाऱ्यांना २०२३ या वर्षाअखेर ज्यांना कमी रेटिंग मिळेल त्यांच्या बोनसमध्ये काही प्रमाणात कपात करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Tech Layoffs: ‘Meta’ मध्ये पुन्हा कमर्चाऱ्यांच्या कपातीची शक्यता, जाणून घ्या काय आहे कारण

मेटा कंपनी आतापर्यंत आपल्या कर्मचाऱ्यांना ८५ टक्के बोनस देत होती. आता हे ६५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार आता वर्षातून एकदा नव्हे तर दोन वेळा कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार आहे.

मार्च २०२३ च्या सुरुवातीलाच मेटा ने १०,००० लोकांची कपात केली होती. कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून याची माहिती दिली होती. यापूर्वी कंपनीने ११ हजार लोकांना नोकरीवरून काढून टाकले आहे. म्हणजेच तब्बल मेटाने २१ हजार लोकांना कामावरून काढून टाकले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 17:12 IST
Next Story
१ एप्रिलपासून ‘UPI पेमेंट’ महागणार! २ हजार रुपयांच्या वरच्या व्यवहारावर लागणार ‘इतका’ चार्ज
Exit mobile version