मिव्हीने स्मार्टवॉच श्रेणीत पदार्पण केले असून आपली पहिली स्मार्टवॉच Mivi Model E भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. ही घड्याळ ५ रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आली असून, तिची किंमत ३९९९ रुपये आहे. मात्र, या घड्याळावर सूट देण्यात आली असून आता ही घड्याळ केवळ १२९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. १ डिसेंबरपासून कपंनीचे अधिकृत संकेतस्थळ आणि फ्लिपकार्टवर या घड्याळीची विक्री सुरू झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फीचर

मिव्ही मॉडल ई ही घड्याळ निळा, काळा, हिरवा, लाल, क्रिम आणि ग्रे या ६ रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. या स्मार्टवॉचमध्ये १.६९ इंच टीएमटी एचडी डिस्प्ले देण्यात आला असून मिव्ही अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही ५० क्लाऊड वॉच फेसेस निवडू शकता. घड्याळीत हार्ट रेट सेन्सर, एसपीओ २ मॉनिटर, स्लीप ट्रॅकर आणि पीरियड ट्रॅकर सारखे फीचर्स मिळतात.

(७ हजारांच्या आत मिळवा ‘हा’ ३२ इंच टीव्ही, अमेझॉनवर मिळत आहे मोठी सूट)

Mivi Model E घड्याळ पायदळ चालाताना स्टेप्स रेकॉर्ड करू शकते. मिव्ही अ‍ॅपद्वारे तुम्ही या सर्व फीचर्सचा मागोवा घेऊ शकता. यासह फिटनेस प्रमींसाठी आनंदाची बातमी आहे. घड्याळीत १२० स्पोर्ट्स मोड मिळतात. घड्याळीत ब्लूटूथ ५.१ वर्जनसह कॅमेरा आणि म्युझिक कंट्रोल, स्मार्ट नोटिफिकेश, वेदर अपडेट, कॉल म्यूट अँड रिजेक्ट हे फीचर्स मिळतात.

Mivi Model E स्मार्टवॉच सिंगल चार्जमध्ये ७ दिवस चालेल, असा कंपनीचा दावा असून ती २० दिवसांपर्यंत स्टँडबाय मोडवर राहू शकते, असाही दवा करण्यात आला आहे. घड्याळात २०० एमएएचची लिथियम पॉलिमर बॅटरी देण्यात आली हे जी मॅग्नेटिक चार्जरद्वारे चार्ज होते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mivi model e smartwatch launched in india check price and features ssb
First published on: 02-12-2022 at 11:33 IST