सध्या आपल्या घरात असणाऱ्या अगदी एखाद्या घड्याळापासून ते टीव्हीपर्यंत कितीतरी वस्तू बॅटरी आणि चार्जिंगवर चालणाऱ्या असतात. अनेकदा अशा वस्तू खासकरून आपला स्मार्टफोन वगैरे आपण व्यवस्थित चार्ज करून घेतो. मात्र, अर्ध्या दिवसातच त्याची बॅटरी संपू लागते आणि आपण मित्रांकडे चार्जर किंवा पॉवर बँक आहे का असे विचारत बसतो आणि त्यातही नेमक्या गरजेच्या वेळेलाच ती पॉवर बँकदेखील बंद पडलेली असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, सध्या बाजारात ६०,०००mAh एवढ्या शक्तीची पॉवर बँक आली असल्याची माहिती इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @Beebom नावाच्या अकाउंटने सांगितले आहे. त्यानुसार ही बॅटरी एवढी शक्तिशाली आहे की, चक्क एखाद्या टीव्हीला देखील ती अगदी सहज बॅटरीचा पुरवठा करू शकते. या Ambrane नावाच्या ब्रँडची ही बॅटरी आहे. एवढ्या शक्तिशाली बॅटरीचे फीचर्स आणि किंमत काय आहे पाहूया.

हेही वाचा : Nothing Phone 2a किंमत, फीचर्स अन् स्पेसिफिकेशन लाँचआधीच आले समोर? जाणून घ्या…

Ambrane बॅटरीची खासियत पाहा

इतर चार्जर्सच्या तुलनेत ही पॉवर बँक अत्यंत शक्तिशाली आहे. ही पॉवर बँक पूर्ण क्षमतेवर कोणत्याही उपकरणांना २००w पेक्षा अधिक गतीने चार्ज करू शकते, बॅटरी पुरवू शकते. या बॅटरीवर तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप, गेमिंग लॅपटॉप किंवा पीएस-५ यांसारखी उपकरणे अगदी सहज पूर्ण क्षमतेने चार्ज करू शकता. इतकेच नाही, तर तुम्ही सॅमसंगचा नवीन आलेला स्मार्टफोन या पॉवर बँकवर जवळपास १२ वेळा चार्ज करू शकता, असे या व्हिडीओमधून सांगितले आहे.

फीचर्स

व्हिडीओमध्ये दिसणारी बॅटरी ही ग्रे आणि काळ्या रंगाची आहे. या बॅटरीमध्ये २ यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. याचा वापर करून तुम्ही तुमचा फोन वगैरे चार्ज करू शकता. याव्यतिरिक्त या बॅटरीमध्ये एकी पॉवर सॉकेट, १ डीसी पोर्ट, १ एसी पोर्ट, बसवण्यात आलेले आहेत. इतकेच नाही तर या भन्नाट पॉवर बँकमध्ये एक शक्तिशाली LED लाईटसुद्धा बसवण्यात आलेला आहे.

हेही वाचा : आता WhatsApp वर मेसेज वाचले तरी कुणाला कळणार नाही; हे कसे करायचे ते पाहा

वजनाला हलकी असणारी ही बॅटरी किंवा पॉवर बँक प्रवासात, पिकनिकला जाताना बरोबर बाळगण्यासाठी खूप फायदेशीर आणि सोयीची आहे. तसेच घरात अचानक बऱ्याचवेळासाठी इलेक्ट्रिसिटी नसल्यास ही बॅटरी फारच फादेशीर ठरू शकते.

इतर उपकरणांना चार्ज करून देणाऱ्या या पॉवर बँकला चार्ज होण्यासाठी मात्र नऊ तास लागतात. आता एवढ्या उपयुक्त आणि भन्नाट अशा बॅटरीची किंमत किती, असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. तर ही बॅटरी कुठे आणि किती रुपयांना मिळत आहे ते पाहूया.

Ambrane बॅटरीची किंमत

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर दाखवण्यात आलेली बॅटरी ही Ambrane ब्रँडची आहे. ही बॅटरी ऑनलाइन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे.
६०,०००mAh एवढ्या शक्तिशाली बॅटरीची मूळ किंमत ही १९,९९९ रुपये इतकी दाखवत आहे. मात्र, त्यावर २०% सूट देऊन ॲमेझॉन या ई-कॉमर्स साईटवर या बॅटरीची किंमत १५,९९९ रुपये इतकी दिसत आहे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @Beebom नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ५.१ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most powerful power bank from smartphone to tv it can charge any device check out this amazing gadget dha
First published on: 17-02-2024 at 19:23 IST