तुम्ही जर जिओ, एअरटेल, Vi आणि बीएसएनल-एमटीएनएल वापरकर्ते असाल तर तुम्हाला दुरसंचार विभागाने (DoT) जारी केलेला नवा नियम माहित असणे आवश्यक आहे. कारण, दूरसंचार विभागाच्या नवीन नियमानुसार आता तुम्ही खरेदी केलेलं नवीन सिम कार्ड अ‍ॅक्टीव्ह केल्यानंतर ते २४ तासांसाठी बंद राहणार आहे. म्हणजे तुमचे सिम कार्ड सक्रिय झाल्यानंतर देखील २४ तासांसाठी तुमच्या कार्डवर इनकमिंग, आउटगोइंगसह एसएमएसची सुविधा बंद राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिम अपग्रेडसाठी करावी लागणार विनंती –

हेही वाचा- कमाई होईल आणि कौशल्यही दिसेल; जिओच्या शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅपमध्ये काय आहे खास? जाणून घ्या

सिम कार्ड फसवणुकीबाबतच्या वाढत्या घटना पाहता हा निर्णय घेतला असल्याचं दूरसंचार विभागाकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय सर्व दूरसंचार कंपन्यांना नवीन नियम लागू करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, ग्राहकाने नवीन सिम किंवा अपग्रेडसाठी विनंती केलेय की नाही, याची पडताळणी सिम सक्रिय झाल्यानंतर २४ तासांमध्ये दुरसंचार विभाग करेल. यादरम्यान जर ग्राहकाने नवीन सिमची विनंती नाकारली तर मग नवीन सिम सक्रिय केले जाणार नाही.

फसवणुकीच्या घटनांना आळा बसणार –

हेही वाचा- व्हॉट्सअ‍ॅपमधून महत्वाचा फोटो, व्हिडिओ डिलीट झाला? असे परत मिळवा

सध्या ग्राहकाचा वैयक्तिक डेटा चोरणे खूप सोप्पं झालं आहे. त्यामुळे अनेकजण ग्राहकांच्या नकळत जुने सिम कार्ड करतात. शिवाय नवीन सिममधून ओटीटी मिळवून बँकिंग संबधीत अनेक फसवणुकीच्या घटना घडत असतात. याचं कारण म्हणजे देशातील नागरिकांच्या डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे.

हेही वाचा- ‘WHATSAPP’ची मोठी कारवाई, भारतातील २३.२४ लाख खाती बंद केली

नागरिकांच्या डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाल्यापासून बँकासंबंधी फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. सिम स्वॅपिंगच्या माध्यमातून बँकिंगची मोठी फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत, सरकारने सर्व टेलिकॉम कंपन्यांना सिम सक्रिय करण्यासाठी २४ तासांच्या आत नवीन सिम लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता तुम्हाला नवीन सिम घ्यायचे असेल तर ते सक्रिय होण्यासाठी २४ तास वाट बघावी लागणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New rule for jio airtel vi users now sim cards will be closed for 24 hours jap
First published on: 02-12-2022 at 18:01 IST