OnePlus 15 announced: हवाईमध्ये नुकत्याच झालेल्या स्नॅपड्रॅगन समिटमध्ये वनप्लसने अधिकृतपणे OnePlus 15ची घोषणा केली आहे. OnePlus 15 हा क्वालकॉमचा नवीनतम फ्लॅगशिप चिपसेट – स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ असलेला पहिला फोन असेल. वनप्लस कंपनीने म्हटले आहे की, हा कंपनीचा इन हाउस विकसित डिटेलमॅक्स इमेज इंजिन असलेला पहिला फोन असेल. तो प्रगत अल्गोरिदम आणि शक्तिशाली प्रोसेसर वापरून अशा प्रतिमा कॅप्चर करतो.

अ‍ॅपल, सॅमसंग आणि गुगलनंतर आता वनप्लस स्मार्टफोन्स प्रिमियम सेगमेंटमध्ये लोकप्रिय ठरू शकतात. वनप्लसकडे त्यांच्या चाहत्यांसाठी बजेटपासून प्रिमियम सेगमेंटपर्यंत स्मार्टफोन्सची एक रेंज आहे. जर तुम्ही प्रिमियम फीचर्ससह नवीन वनप्लस स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा, कारण कंपनी लवकरच त्यांच्या चाहत्यांसाठी एक नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे. कंपनीचा आगामी फ्लॅगशिप फोन OnePlus 15 असेल, यामध्ये 165 Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले असेल.

OnePlus 15 पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये बाजारात येईल. या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये लाँचिंगपूर्वीच लीक झाली आहेत. एका चिनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरील नवीन लीकमध्ये त्याचे काही फीचर्सही लीक झाले आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या फोनच्या वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया…

OnePlus 15ची वैशिष्ट्ये

GizmoChinaच्या ताज्या रिपोर्टनुसार, OnePlusने अलिकडेच OnePlus 15ची टीझर इमेज रिलीज केली आहे. या इमेजमधून त्याच्या डिस्प्लेबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हा स्मार्टफोन पंच-होल कटआउट डिस्प्लेसह येऊ शकतो. जर तुम्ही गेमिंगचे चाहते असाल तर तुम्हाला हा स्मार्टफोन नक्की आवडेल. चाहते 165Hz पर्यंत डिस्प्लेची अपेक्षा करू शकतात.

माहितीनुसार, OnePlus 15चा डिस्प्ले 1.5k रिझोल्यूशनला सपोर्ट करू शकतो. हायस्पीड परफॉर्मन्ससाठी त्यात स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ चीपसेटदेखील असू शकतो. स्मार्टफोनमध्ये १६ जीबी रॅमदेखील असू शकतो आणि तो अँड्रॉइड १६ आउट ऑफ द बॉक्सला सपोर्ट करू शकतो.

OnePlus 15 कॅमेरा

OnePlus 15 मध्ये मागील पॅनलवर ५० मेगापिक्सेलचाप्राथमिक कॅमेरा आहे. तसंच १६ मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आणि अल्ट्रा-वाइट कॅमेरा असू शकतो. या स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरासह एक शार्प सेल्फी कॅमेरा असू शकतो.

OnePlus 15ची बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी पर्याय

वनप्लसने कायम त्यांच्या स्मार्टफोन्समध्ये मोठ्या बॅटरी दिल्या आहेत. लीक्सवरून असे दिसून आले आहे की, येणाऱ्या OnePlus 15मध्ये सुपरफास्ट चार्जिंगसह ७००० एमएएच बॅटरी असू शकते. फास्ट चार्जिंगसाठी ते १०० वॅट फास्ट चार्जिंगदेखील देऊ शकते. याव्यतिरिक्त स्मार्टफोन ५० वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. कनेक्टिव्हिटीसाठी ते वाय-फाय, ब्लुटूथ आणि ड्युअल सिम कार्ड स्लॉटला सपोर्ट करेल. चार्जिंगसाठी त्यात यूएसबी टाइप-सी पोर्टदेखील असेल.