Oppo ही एक लोकप्रिय मोबाइल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करत असते. नुकताच कंपनीने भारतात आपला Oppo A78 हा फोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 SoC आणि ८ जीबी रॅम द्वारे जोडलेले आहे. हा फोन ColorOS 13.1 आउट-ऑफ-द-बॉक्स वर चालतो. खरेदीदार हा फोन दोन रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहेत. या फोनची किंमत,फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Oppo A78 चे फीचर्स

नवीन लॉन्च झालेल्या ओप्पो A78 ड्युअल सिम (नॅनो) चा सपोर्ट मिळतो. हा फोन कंपनीच्या ColorOS 13.1 स्किनसह Android च्या अनस्पेसिफाईड व्हर्जनवर चालतो. यात ग्राहकांना ६.४२ इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले मिळतो. तसेच हा फोन Adreno 610 GPU सह ८ जीबी LPDDR4X रॅम शी जोडलेले आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

हेही वाचा : अ‍ॅपल AirPods Pro केवळ ६९० रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी, ‘या’ ठिकाणी मिळतोय मोठा डिस्काउंट

ओप्पोच्या या नवीन फोनमध्ये ७७ डिग्री व्ह्यू फील्ड आणि f/1.8 अपर्चरसह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा , ८९ डिग्री व्ह्यू फील्डसह २ -मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. Oppo A78 mdhye 128 जीबी इनबिल्ट UFS 2.2 स्टोरेज मिळते. जे मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते. कनेक्टिव्हिटीसाठी G LTE, Wi-Fi, Bluetooth 5, GPS आणि A-GPS सपोर्ट मिळतो. याला ५००० mAh क्षमतेची बॅटरी व त्याला ६७ W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट मिळतो.

किंमत आणि उपलब्धता

भारतात Oppo A78 ची किंमत ही १७,४९९ रुपये आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या एकाच पर्यायामध्ये हा फोन उपलब्ध आहे. हा फोन Aqua Green आणि Mist Black या दोन रंगात उपलब्ध आहे. हा फोन खरेदीदार कंपनीच्या ऑनलाइन स्टोअर, फ्लिपकार्टद्वारे खरेदी करू शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oppo a78 launch india in 17499 rs 50 mp camera 5000 mah battery check features and details tmb 01