सध्या स्मार्टफोन क्षेत्रात फोल्डेबल तंत्रज्ञानाची जोरदार चर्चा सुरू आहे. अलिकडे फोल्डेबल तंत्रज्ञान नसल्याच्या पार्श्वभूमीवर सॅमसंगने एका जाहिरातीद्वारे अ‍ॅपलला ट्रोल केले होते. त्यानंतर हे तंत्रज्ञान आणखी चर्चेत आले. असूसने देखील आपला फोल्डेबल लॅपटॉप लाँच केला आहे. आता अ‍ॅपल या तंत्रज्ञानासह उपकरणे कधी लाँच करणार याबाबत चाहते उत्सुक्त असताना ओप्पो बाजारात पुन्हा एक नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनबाबत एक व्हिडिओ पुढे आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Oppo Find N हा कंपनीचा पहिला फोल्डिंग स्मार्टफोन आहे जो प्रायमरी फोल्डिंग डिस्प्ले आणि मोठ्या एक्सटर्नल डिस्प्लेसह उपलब्ध आहे. आता कंपनी आणखी एका फोल्डिंग फोनवर काम करत आहे. हा फोन दिसायला गॅलक्सी झेड फ्लिप ४ सारखा असेल. या फोनबाबत एक व्हिडिओ ऑलनलाईन लिक झाला आहे.

(TWITTER: इलॉन मस्कच्या पुणेकर मित्राचे खाते निलंबित, ‘हे’ आहे कारण)

व्हिडिओमधून Oppo Find N2 Flip स्मार्टफोनच्या काही फीचर्सबाबत माहिती उघड झाली आहे. व्हिडिओनुसार, फोनला मोठा कवर डिस्प्ले मिळेल आणि अनफोल्ड केल्यावर तो नेहमीच्या स्मार्टफोनसारखा दिसेल. फोनमध्ये मोठी फोल्डिंग डिस्प्ले आणि ६.५ इंच इनर डिस्प्ले मिळेल ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआऊट मिळेल.

व्हिडिओनुसार, फोनमध्ये मोठा व्हर्टिकल कवर डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे आणि तो एलईडी फ्लॅशलाईटसह उपलब्ध होऊ शकतो. त्याचबरोबर, फोनमध्ये आयआर सेन्सर देखील असेल जे वेगाने फोकस करण्यात मदत करते. फोनच्या बिल्ड क्वालिटीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सुरक्षेसाठी फोनला मजबूत केस असल्याचे दिसते. फोन मेटल फ्रेमसह ग्लास सँडविच डिजाईनसह उपलब्ध केला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oppo find n2 flip video leaked online check features ssb
First published on: 02-12-2022 at 13:54 IST