सध्या सर्वत्र स्मार्टवॉचची क्रेज पहायला मिळते. कारण धावत्या जीवनशैलीत ‘स्मार्टवॉच’ हे अतिशय उपयुक्त उपकरण ठरते आहे. आरोग्यासाठी उपयुक्त फीचर्स या स्मार्टवॉचमध्ये असतात. म्हणून भारतीय बाजारात गेल्या काही वर्षांत स्मार्टवॉचचा ग्राहकवर्ग तयार होऊ लागला आहे आणि ‘स्मार्टवॉच’ला सध्या जास्त मागणी वाढत चालली आहे.

तर हीच गोष्ट लक्षात ठेवून Pebble कंपनीने त्यांच्या नवीन स्मार्टवॉचची घोषणा केली आहे. या स्मार्टवॉचचे नाव Royale असे आहे. तसेच कंपनी दावा करते की, हे जगातील सर्वात स्लिम ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच आहे; ज्यात आकर्षक डिझाइन आणि फीचर्स आहेत. कंपनीच्या नवीन स्मार्टवॉचची किंमत, फीचर्स काय आहेत ते जाणून घेऊ.

स्मार्टवॉचमध्ये एक गोल स्टेनलेस स्टील डायल आहे. या स्मार्टवॉचच्या फ्रेममध्ये फक्त तीन मिमी आणि बॉडी थिकनेस (thickness) सहा मिमी आहे. यात सुपर AMOLED १.१६ डिस्प्लेदेखील आहे; जो अल्ट्रा वाइड कलर गॅमट, सुपर वाइड व्ह्यूइंग अँगल आणि नेहमी ऑन डिस्प्ले सपोर्ट यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.

हेही वाचा…‘या’ कंपनीच्या स्मार्टफोन्समध्ये दिला जाणार Leica चा आयकॉनिक कॅमेरा; पाहा काय असणार खास

पण, हे स्मार्टवॉच फक्त दिसायला आकर्षक नसून यात प्रगत BT कॉलिंग फीचर्सदेखील आहेत. तुम्ही यात व्हॉइज ओव्हरच्या मदतीने कॉल करू आणि उचलूदेखील शकता. कारण यामध्ये एक व्हॉइस असिस्टंट असणार आहे. तसेच खास गोष्ट अशी की, तुम्ही यात गजर (अलार्म), कॅलेंडर, कॅलक्युलेटर, झोप मॉनिटर करणे, हृदयाची गती तपासणे आणि SpO2 साठी प्रगत आरोग्य निरीक्षण यांसारख्या इतर स्मार्ट फीचर्सचा यात समावेश आहे. तसेच पूर्ण चार्ज झाल्यावर या स्मार्टवॉचची बॅटरी पाच दिवसांपर्यंत टिकेल; असा दावा करण्यात आला आहे. तसेच या स्मार्टवॉचचे पाणी आणि धूळीपासून संरक्षण करण्यासाठी यामध्ये IP67 प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

या स्मार्टवॉचचे डिजाइन खूप हलके आहे. या स्मार्टवॉचचे वजन फक्त ४० ग्रॅम आहे. तुम्ही चामड्याचे किंवा चुंबकीय, व्हिस्की ब्राउन, पाइन ग्रीन आणि कोबाल्ट ब्लू यांसारखे विविध रंग पर्याय या स्मार्टवॉचसाठी निवडू शकता. तर हे स्मार्टवॉच केवळ pebblecart.com वर ग्राहकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच या स्मार्टवॉचची लाँच किंमत ४,२९९ रुपये आहे. तर स्वस्तात मस्त जबरदस्त फीचर्स असणारा हा स्मार्टवॉच तुम्हीसुद्धा खरेदी करू शकणार आहात