वन प्लसचे वन प्लस १२ व वन प्लस १२ R हे स्मार्टफोन्स २३ जानेवारी रोजी भारतात लाँच होणार आहेत. मात्र, हे स्मार्टफोन लाँच होण्याआधीच त्या फोनची किंमत किती असेल याचा अंदाज कळला आहे. त्यासोबतच ही कंपनी तिच्या प्रीमियम फोन्सची किंमत जुन्या उत्पादनांपेक्षा फक्त काही हजारांनी वाढवणार असल्याचीही माहिती आपल्याला इंडिया टुडेच्या एका लेखातून मिळते. नेमकी नव्या स्मार्टफोनची किंमत किती आहे ते पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीपस्टार योगेश ब्रार याने वन प्लस १२ चा बेस व्हेरियंट हा साधारण ५८ ते ६० हजारांपर्यंत येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हे जर खरे असेल, तर अनेक स्पर्धा कमी होऊन वापरकर्त्यांसाठी ते फायदेशीर ठरू शकते. माहितीसाठी या वर्षी वनप्लसने वनप्लस ११ हा फोन लाँच केला होता आणि त्याची किंमतही ५६,९९९ रुपये इतकी होती. याचा अर्थ वनप्लस या नवीन उत्पादनाच्या किमतीत मार्जिनसाठी भरमसाट वाढ न करण्याऐवजी केवळ काही हजार रुपयांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. परंतु, त्यामुळे तुम्ही आतापासूनच खुश होऊ नका. कारण- किमतीचे हे आकडे म्हणजे फक्त अंदाज किंवा शक्यता आहे.

हेही वाचा : iqoo 12 की OnePlus 12 कॅमेरा, बॅटरी आणि इतर फीचर्समध्ये कोणता स्मार्टफोन ठरतो सर्वात बेस्ट? जाणून घ्या…

वनप्लस १२ R हा फोनदेखील आपल्या किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ करणार असून, हा स्मार्टफोन साधारण ४० ते ४२ हजारांपर्यंत [बेस मॉडेल] येण्याची शक्यता आहे. तुलनेसाठी वनप्लस ११ R बेस मॉडेलची किंमत ३९,९९९ रुपये इतकी होती.

काही काळापूर्वी वनप्लस R व्हेरियंटची सुरुवात ३५ हजारांपासून होत असे. मात्र, कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि कंपनीच्या प्रीमियम फीचर्समुळे फोनच्या किमतीमध्येही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे जर या लीक झालेल्या किमतीचा विचार केला आणि त्या खऱ्या निघाल्या, तर वापरकर्त्यांसाठी ते फायद्याचे ठरेल. सोबतच फोन लाँच करतानाच्या वेळी फोन खरेदी करताना बँक ऑफर्ससुद्धा मिळू शकतात.

परंतु, हे सर्व किमतीचे आकडे हा एक अंदाज किंवा शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या स्मार्टफोनच्या प्रत्यक्ष किमतींबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, हे लक्षात ठेवावे.

चीनमध्ये वनप्लसने वनप्लसच्या एस-३ [ace ३] डिझाईनचे टिझिंग केले असून, जगभरात ते वनप्लस एस-३ हे मॉडेल वनप्लस १२ R म्हणून पदार्पण करील. वन प्लसची एस [ace] सीरिज ही चीनबाहेर कायमच R सीरिज म्हणून ओळखली गेली आहे आणि असेच पुढच्या जनरेशनसोबतही होणे अपेक्षित आहे, असेदेखील इंडिया टुडेच्या लेखातील माहितीमधून कळले आहे.

हेही वाचा : तुमचा फोन तुमचे बोलणे ऐकतोय का? तुम्हालाही असा प्रश्न पडला आहे का? मग एकदा ‘ही’ माहिती नक्की वाचा…

टिझरमधील वन प्लस १२ R ‘मिशांग गोल्ड’चा रंग अतिशय सुंदर आणि डोळ्यांत भरणारा, असा आहे. या फोनचे डिझाईन हे बरेचसे वनप्लस १२ आणि वनप्लस ११ R सारखे दिसत असले तरीही कंपनीने हे डिझाईन अजून विशेष बनवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, फोनच्या मागील गोलाकार कॅमेरा अजूनही तसाच ठेवण्यात आलेला आहे. या फोनमध्ये मेटल फ्रेम असून, गोल्ड मेल्टिंग ग्लास प्रक्रियेचा वापर करण्यात आला आहे. त्यासोबतच बाजूला अलर्ट स्लायडरसुद्धा बसवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Price range for oneplus 12 and oneplus 12r tipped ahead of january launch in india dha