realme gt neo 5 could get 250 w fast charging says leak | Loksatta

अबब.. काही मिनिटांतच होणार फूल चार्ज! ‘या’ फोनमध्ये मिळू शकते २५० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट

रिअलमी एका नव्या सिरीजवर काम करत असून त्याद्वारे ती फास्ट चार्जिंगबाबत नवा विक्रम रचू शकते, असे एका लिकमधून समोर आले आहे.

अबब.. काही मिनिटांतच होणार फूल चार्ज! ‘या’ फोनमध्ये मिळू शकते २५० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट
प्रतिकात्मक (pic credit – realme.com)

मोबाईलच्या मर्यादित बॅटरी क्षमतेमुळे तो दीर्घकाळ वापरता येत नाही. अशात फास्ट चार्जिंग फीचर उपयुक्त ठरू शकते. या फीचरद्वारे फोन लवकर चार्ज करता येतो. मात्र, यातही ३० मिनिटे जातच असतील. परंतु, रिअलमी realme gt neo 5 सिरीजवर काम करत असून त्याद्वारे ती फास्ट चार्जिंगबाबत नवा विक्रम रचू शकते, असे एका लिकमधून समोर आले आहे. realme gt neo 5 सिरीजमध्ये realme gt neo 5t हे व्हेरिएंटअसू शकतात.

कंपनी ही सिरीज २०२३ च्या पहिल्या तिमाहीत सादर करू शकते, असे समोर आले आहे. फास्ट चार्जिंगच्या बाबतीत realme gt neo 5 हा सर्व विक्रम तोडेल आणि फोनमध्ये चक्क २४० वॉट फास्च चार्जिंग फीचर असेल, असे लिकमधून पुढे आले आहे. असे असल्यास फोन काही मिनिटांमध्येच फूल चार्ज होईल.

(YOUTUBE TOP 10 यादी जाहीर, 2022 मध्ये ‘या’ व्हिडिओजना सर्वाधिक पसंती, कोणी पटकवले पहिले स्थान? पाहा)

टीपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने फोनच्या चार्जिंगबाबत विबोवर पोस्ट शेअर केली आहे. यात नवीन सिरीजच्या एका व्हेरिएंटध्ये ५ हजार एमएएच बॅटरीसह १५० वॉट फास्ट चार्जिंग आणि दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये २४० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल, असे सांगण्यात आले आहे. दोन्ही फोनचे मॉडेल नंबर अनुक्रमे BLP985 आणि BLP987 असे आहे. दोन्हीही डिव्हाइसमध्ये कंपनी ड्युअल सेल तंत्रज्ञान वापरणार आहे, ज्यात एक मोठी बॅटरी देण्याऐवजी दोन भागांत बॅटरी मिळते. याचा फायदा फास्ट चार्जिंगच्या वेळी मिळतो.

realme gt neo 5 मध्ये मिळू शतात हे फीचर

नवीन realme gt neo 5 मध्ये ६.५ इंच एफएचडी + अमोलेड डिस्प्लेसह मीडियाटेक डायमेन्सिटी ९ सिरीज प्रोसेसर मिळू शकतो आणि ५० एमपी कॅमेऱ्यासह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. फोनमध्ये सेल्फीसाठी १६ एमपी किंवा ३२ एमपी फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 19:22 IST
Next Story
विश्लेषण: ६ दिवसात १० लाख युजर्स, एलॉन मस्कने केलं कौतुक, गुगलपेक्षा अचूक उत्तर देणारं ChatGPT कसं करतं काम?