आजकाल सर्वत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ची चर्चा सुरू आहे. AI द्वारे अनेक लोकांच्या कामाची पद्धत अधिक साधी, सोपी, सरळ व्हावी हा यामागचा उद्देश आहे. काही दिवसांपूर्वी सॅमसंग कंपनीने ७० टक्के वीज बचत करणारी ऑटोमॅटिक AI वॉशिंग मशीन लाँच केली होती, तर १७ जानेवारी २०२४ रोजी सॅमसंगने कॅलिफोर्नियातील SAP सेंटर येथे आयोजित गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटदरम्यान सॅमसंग गॅलेक्सी एस२४ (Samsung Galaxy S24) सीरिज लाँच केली. या सीरिजच्या तिन्ही स्मार्टफोनमध्ये AI फीचर्स दिले आहेत. तर आता कंपनी सॅमसंगच्या इतर फ्लॅगशिप स्मार्टफोन्स आणि डिव्हाइजमध्येसुद्धा एआय फीचर्स घेऊन येणार आहे. तर आज आपण या लेखातून सॅमसंगच्या कोणत्या डिव्हाइजमध्ये एआय फीचर्स असणार आहेत हे पाहू.

सॅमसंग कंपनीने अलीकडेच गॅलेक्सी एस २३(Galaxy S23) सीरिज, एस २३ एफई (S23 FE), झेड फोल्ड ५ (Z Fold5), झेड फ्लिप५ (Z Flip5) आणि टॅब एस९ (Tab S9) सीरिज यांसारख्या उपकरणांसाठी गॅलेक्सी एआय१ (Galaxy AI1) फीचर्सची उपलब्धता जाहीर केली आहे.

9to5Google, अँड्रॉइड सेंट्रल आणि द व्हर्जने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, सॅमसंग त्यांच्या जुन्या फ्लॅगशिप डिव्हाइसेससाठी वन युआय ६.१ (One UI 6.1) अपडेटद्वारे गॅलेक्सी AI फीचर्स आणण्यास सुरुवात करणार आहे. एस२२ (S22), एस२२ प्लस (S22 Plus), एस२२ अल्ट्रा (S22 Ultra), झेड फोल्ड ४ (Z Fold 4), झेड फ्लिप ४ (Z Flip 4), टॅब एस ८ (Tab S8) टॅब S8 अल्ट्रा (Tab S8 Ultra) यांसह Galaxy AI ची ट्रिम-डाउन आवृत्ती, इन्स्टंट स्लो-मो फीचर्स वगळून सॅमसंगच्या फ्लॅगशिप डिव्हाइसेससाठी एआय फीचर्स रिलीज होणार आहे.

हेही वाचा…50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…

तसेच २०२१ पासून फ्लॅगशिप सॅमसंग फोन वापरकर्त्यांसाठी कंपनी आगामी अपडेटमध्ये एस२१ (S21), एस२१ प्लस (S21 Plus), एस२१ अल्ट्रा (S21 Ultra), फ्लिप ३ (Flip 3) आणि फोल्ड ३ (Fold 3) सारख्या मॉडेल्समध्ये Galaxy AI फीचर्स, सर्कल टू सर्च आणि मॅजिक रीराईट आदी फीचर्स उपलब्ध करून देणार आहे.

Galaxy AI फीचर्सच्या माध्यमातून युजर्स लाइव्ह ट्रान्सलेशन, चॅट असिस्ट फीचर्स, सर्कल टू सर्च फीचर, मॅजिक रीराईट यांसारख्या अनेक स्पेशल फीचर्सचा आनंद घेऊ शकतात. सर्कल टू सर्च फीचर एखादी माहिती शोधण्यास मदत करेल, तर मॅजिक रीराईट तुमच्या मजकुरातील चुका दुरुस्त करण्यास मदत करेल. सॅमसंगने सध्या Galaxy AI मध्ये काही निवडक खास फीचर्स समाविष्ट केले आहेत. पण, कंपनीने असा दावा केला आहे की, Galaxy AI च्या फीचर्स हळूहळू ॲडव्हॉन्स करतील.