Samsung ही एक टेक कंपनी आहे. कंपनी अनेक प्रॉडक्ट्स आपल्या ग्राहकांसाठी लॉन्च करत असते. सॅमसंग कंपनी एक दक्षिण कोरियन कंपनी आहे. सॅमसंगचा एक इव्हेंट होणार आहे त्याबद्दल कंपनीने काही माहिती दिली आहे. बुधवारी सॅमसंगने सांगितले कंपनी आपला पुढील ‘Unpacked’ इव्हेंट लवकरच आयोजित करणार आहे. हा इव्हेंट दक्षिण कोरिया येथे आयोजित केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सॅमसंग कंपनीच्या दक्षिण कोरियातील प्रमुखाने हे स्पष्ट केले की हा इव्हेंट जुलै महिन्यात होणार आहे. मात्र हा इव्हेंट कोणत्या तारखांना होणार आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. Unpacked २०२३ मध्ये खूप कालावधीपासून चर्चा असलेल्या Galaxy Z Fold 5 आणि Galaxy Z Flip 5 चे लॉन्च पॅड म्हणजेच लॉन्च होण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

हेही वाचा : तब्बल २० लाखांपेक्षा अधिक कुटुंबांना मिळणार मोफत इंटरनेट सेवा; भारतातील ‘या’ राज्याने केली मोठी घोषणा

Unpacked हा सॅमसंगचा फ्लॅगशिप इव्हेंट आहे. ज्यामध्ये विशेषतः कंपनी नवीन स्मार्टफोन आणि इतर प्रॉडक्ट्सची घोषणा करतो. कंपनीने आधीचे इव्हेंट हे जगातील अनेक प्रमुख शहरांमध्ये आयोजित केले आहेत. या वर्षी प्रथमच Unpacked इव्हेंट त्याच्या मूळ देशामध्ये दक्षिण कोरियामध्ये होणार आहे. तथापि या इव्हेंटमध्ये काय काय लॉन्च होऊ शकते यावर कंपनीने काही सांगितले नसले तरी , कंपनी दोन नवीन फोल्डेबल फोन्सची घोषणा करण्याची शक्यता आहे. Galaxy Z Fold 5 आणि Z Flip 5 बाबत अनेक दिवस चर्चा सुरू आहे.

फोल्डेबल स्मार्टफोनची चर्चा असते तेव्हा सॅमसंग कंपनी प्रमुख समजली जाते. या टेक कंपनीने दरवर्षी आपले फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. मात्र हे फोल्डेबल फोन केवळ प्रीमियम सेगमेंटमध्येच कंपनीने लॉन्च केले आहेत. फोल्डेबल स्मार्टफोनच्या सेगमेंटमध्ये सॅमसंगला चिनी फोन ब्रँड्सशी स्पर्धात्मक सामना करावा लागत आहे. तसेच वनप्लसचा पुढील फ्लॅगशिप हा फोल्डेबल स्मार्टफोन असू शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy unpacked event in july south corea competition to chinia brands check details tmb 01
First published on: 07-06-2023 at 11:23 IST