केवळ ३० हजारांमध्ये मिळतोय Samsung चा १ लाख रुपयांचा 'हा' जबरदस्त स्मार्टफोन, फ्लिपकार्टवर मिळतेय भरघोस सूट | samsung galaxy Z flip 3 smartphone from Samsung company is getting huge discount on flipkart | Loksatta

केवळ ३० हजारांमध्ये मिळतोय Samsung चा १ लाख रुपयांचा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन, फ्लिपकार्टवर मिळतेय भरघोस सूट

हा फोन तुम्ही कमी किमतीत कशा प्रकारे खरेदी करू शकता याबदल अधिक जाणून घेऊयात.

Samsung Galaxy Z Flip 3 Big Discount news
Samsung – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

आजकाल स्मार्टफोन आपली महत्वाची गरज बनला आहे. त्याशिवाय आपली अनेक कामे ही पूर्ण होतच नाहीत. मात्र आपण चांगले फीचर्स आणि आकर्षक डिझाईन असलेला स्मार्टफोन खरेदी करत असतो. जर तुमची अणि तुमचा स्मार्टफोन गर्दीमध्ये असे उठून दिसायला हवे असाल तर, तुम्ही Samsung कंपनीचा Samsung Galaxy Z Flip 3 हा फोन खरेदी करू शकता. याचे Galaxy Z Flip 4 हे नवीन मॉडेल देखील लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे या आधीच्या मॉडेलची कंपनी मोठ्या डिस्काउंटसह विक्री करत आहे. यामध्ये अनेक आकर्षक फीचर्स आहेत. हा फोन तुम्ही अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहात. हा फोन तुम्ही कमी किमतीत कशा प्रकारे खरेदी करू शकता याबदल अधिक जाणून घेऊयात.

Samsung Galaxy Z Flip 3 या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टवर डिस्काउंट मिळत आहे. याची मूळ किंमत ९५,९९९ रुपये आहे. मात्र तुम्ही हा फोन केवळ २९,९९९ रुपयांनी खरेदी करू शकणार आहात. कंपनी यावर ४७ टक्क्यांची सूट देत आहे. यामुळे याची किंमत ४९,९९९ रुपये झाली आहे.

हेही वाचा : FASTag चा रिचार्ज करताय तर सावधान! एका व्यक्तीच्या अकाउंटमधून उडाले १ लाख रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Samsung Galaxy Z Flip 3 – संग्रहित छायाचित्र / फायनान्शिअल एक्सप्रेस

याशिवाय तुम्ही या फोनची किंमत आणखी कमी करू शकता . यासाठी तुम्हाला एक्सचेंज ऑफर आणि बँकेच्या ऑफर्स याचाही फायदा घ्यावा लागणार आहे. याय फोनवर २०,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. ही एक्सचेंज ऑफर तुमच्या फोनच्या किंमतीवर अवलंबून असते.

तुम्ही तुमचा पिनकोड आणि फोनचे मॉडेल देऊन तुम्ही एक्सचेंजची किंमत जाणून घेऊ शकता. या सर्व डिस्काउंटनंतर Samsung Galaxy Z Flip 3 ची किंमत २९,९९९ रुपये होणार आहे. या फोनची डिस्काउंट नंतरची किंमत iPhone SE पेक्षा कमी आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 16:13 IST
Next Story
Oppo Smartphones: ओप्पोने लाँच केला १०८ मेगापिक्सलचा जबरदस्त कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत