Amazon ने २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त खास सेलची घोषणा केली आहे. ‘Amazon ग्रेट रिपब्लिक डे’ असे या सेलचे नाव आहे. हा सेल १९ जानेवारी ते २२ जानेवारी २०२३ असा असणार आहे. यातील विशेष गोष्ट म्हणजे अ‍ॅमेझॉन प्राईमचे मेंबर असणाऱ्यांना १८ जानेवारी पासून या सेलमधील ऑफर्सचा फायदा घेता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान खरेदीदारांना अनेक ब्रँड्सच्या प्रॉडक्ट्सवर ऑफर्स मिळणार आहेत. मात्र सोनी कंपनीने आपल्या काही प्रॉडक्ट्सवर ऑफरची घोषणा केली आहे. सोनी कंपनीने अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये हेडफोन्स , एअरफोन्स आणि स्पीकरवर ऑफरची घोषणा केली आहे. तर आता ऑफर नक्की आहे तरी काय ते आपण जाणून घेऊयात.

हेही वाचा : Amazon Sale 2023: अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक सेलमध्ये अनेक वस्तूंवर भरघोस सूट, जाणून घ्या कधीपासून होणार सुरुवात

Sonyचे WH-1000XM4 हेडफोन

Sony WH-1000XM4 हे हेडफोन कम्फर्टेबल वाटावेत म्हणून कानावर नीट बसेल अशा प्रकारचे येते. त्या प्रकारे त्याचे डिझाईन करण्यात आलेले आहे. यामध्ये ब्लूटूथ ५.० , टच कंट्रोल्स आणि युएसबी सी पोर्ट असे फीचर्स येतात. हे हेडफोन बिल्ट इन मायक्रोफोनला सपोर्ट करतात व ड्युअर पेअरिंग मध्ये येतात. या सेलमध्ये हे हेडफोन तुम्हाला १९,९०० रुपये या सवलतीच्या किंमतीत मिळणार आहेत.

Sonyचे WF-1000XM4 एअरफोन्स

या एअरफोनमध्ये ६ एमएम ऑडिओ ड्रायव्हर्स आणि ३६ तसंच बॅटरी बॅकअप असे फीचर्स येतात. हे इअरफोनची किंमत ही १३,९९० रुपये आहे. यात तुम्हाला ३००० रुपये कॅशबॅक मिळणार आहे.

Sonyचा SRS-XG300 स्पीकर

हा स्पीकर तुम्हाला सेलमध्ये २२,९९० मध्ये उपलब्ध असणार आहे. या स्पिकरला ब्लूटूथ कनेक्शन आणि स्टिरिओ पेअरिंग येते. याला चार्जिंगसाठी सी टाईप पोर्ट आहे. एकदा चार्ज केल्यावर २५ तासांचा बॅटरी बॅकअप येतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sony announced some product offers for its customers on amazon great republic day tmb 01