Window AC vs Split AC: देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये सध्या लोकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात तापमानाचा पारा इतका वाढला आहे की, घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी एअर कंडिशनर हा एकमेव मार्ग आहे. बाजारात भरपूर विंडो आणि स्प्लिट एसी उपलब्ध आहेत. खरेदीच्या वेळी घरासाठी कोणता एसी अधिक चांगला असेल, याबाबत अनेकदा संभ्रम असतो. अनेक लोकांच्या तक्रारी असतात की, एसी लावल्याने वीज बिल जास्त येते. मग विंडो की स्प्लिट एसी कोणता एसी सर्वात कमी वीज वापरतो अन् कोणत्या एसीच्या वापराने तुम्हाला बिल जास्त येऊ शकतो, जाणून घेऊया…

बहुतेक लोक त्यांच्या खोलीचा आकार आणि त्यांच्या घराची रचना लक्षात घेऊन एसी खरेदी करतात आणि नंतर प्रचंड वीज बिलांना सामोरे जावे लागते. बहुतेक लोकांना दोनपैकी कोणता, स्प्लिट किंवा विंडो एसी, जास्त वीज बिल कोणत्या एसीमुळे येते हे माहीत नसते. तुम्हालाही याची माहिती नसेल, तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे.

(हे ही वाचा : रील्स स्क्रोल करताना आता थांबावच लागणार; इन्स्टाग्रामचं हे नवीन फीचर काम करणार ‘असं’)

‘या’ एसीमुळे जास्त वीज बिल

स्प्लिट एसीच्या तुलनेत विंडो एसी कमी वीज वापरतो आणि त्यामुळे विंडो एसीमध्ये बिल कमी येते असे अनेकांना वाटते. इतकंच नाही तर अनेकदा लोकांना वाटतं की, विंडो एसीचा आकार लहान आणि त्यात एक युनिट असल्याने बिल कमी येईल. पण, असे अजिबात नाही. स्प्लिट एसीच्या तुलनेत विंडो एसीमध्ये वीज बिल जास्त येतो.

बाजारात स्प्लिट एसीपेक्षा काही काही विंडो एसी स्वस्तही असू शकतात, परंतु तुम्ही एसी खरेदी करताना जितके पैसे वाचवता, त्यापेक्षा जास्त पैसे नंतर वीज बिलावर खर्च होतात. तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, विंडो एसी साधारणपणे ताशी ९०० ते १४०० वॅट वीज वापरतात. जेव्हा तुम्ही कूलिंग वाढवण्यासाठी एसीचे तापमान कमी करता तेव्हा कंप्रेसरवर जास्त ताण येतो आणि विजेचा वापर जास्त होतो.

स्प्लिट एसीमध्ये कन्वर्टेबल आणि इन्व्हर्टर तंत्रज्ञानासारखे अनेक प्रकारचे नवीनतम तंत्रज्ञान आहेत. यामुळे, स्प्लिट एसी अधिक वीजेची बचत देते.

जर तुमची खोली खूपच लहान असेल तर तुम्ही विंडो एसी घेऊ शकता, पण मोठ्या खोल्यांसाठी फक्त स्प्लिट एसी प्रभावी आहे. विंडो एसी २४ डिग्री ते २६ डिग्री तापमानात एक लहान खोली देखील थंड करेल. खोलीचा आकार आणि तुमचा एसी किती टनाचा आहे यावर कूलिंग अवलंबून असतं. त्यामुळे तुमच्या खोलीच्या आकाराला साजेसा एसी खरेदी करावा.