Thomson ही एक लोकप्रिय कंपनी आहे. थॉमसन कंपनी फ्रेंचमधील एक कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड आहे. कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी टीव्ही आणि वॉशिंग मशीन सिरीज लॉन्च केली आहे. ही सिरीज लवकरच फ्लिपकार्टवर लॉन्च होणार आहे. तसेच याचा फ्लॅश सेल देखील येणार आहे. कंपनीने आपल्या भारतीय वापरकर्त्यांसाठी QLED, OATH प्रो मॅक्स आणि FA सिरीजमध्ये नवीन टीव्ही प्रॉडक्ट्स लॉन्च केले आहेत. त्यामध्ये ४३ इंचाचा QLED, ४३ इंचाचा रिअलटेक प्रोसेसरसह FA सिरीज टीव्ही, 4k डिस्प्ले असणारा ५५ इंचाचा गुगल टीव्ही आणि ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशीनची एक नवीन सिरीज लॉन्च केली आहे.
FA टीव्ही
रिअलटेक प्रोसेसर असलेला Fa टीव्हीमध्ये बेझल लेस डिझाइन, ३० W चे स्पीकर, डॉल्बी डिजिटल, बिल्ट इन नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, डिस्नी + हॉटस्टार, Apple टीव्ही, voot सारखे ६०० पेक्षा जास्त अँप्स, ११ प्रीमियम फीचर्स मिळतात. गुगल प्ले स्टोअरवर ५ लाख टीव्ही शो मिळतात. या ४३ इंचाची नवीन FA सिरीजची किंमत १७,४९९ रुपये आहे. याबाबतचे वृत्त hindustantimes ने दिले आहे.
गुगल टीव्ही
४ के डिस्प्ले असणाऱ्या गुगल टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन HDR 10+, डॉल्बी ऍटमॉस, डॉल्बी डिजिटल प्लस, DTS ट्रूसराउंड, ४० डॉल्बी ऑडिओ स्टिरिओ बॉक्स स्पीकर, २ जीबी रॅम, १६ जीबी ROM, ड्युअल बँड GHz चा सपोर्ट मिळतो. ५५ इंचाच्या गुगल टीव्हीची किंमत ३२,९९९ रुपये आहे.
थॉमसन QLED टीव्ही
थॉमसन कंपनीने QLED TV लॉन्च केला आहे. हा टीव्ही पूर्णपणे फ्रेमलेस आहे. यामध्ये HDR 10+, डॉल्बी ऍटमॉस, डॉल्बी डिजिटल प्लस, DTS ट्रूसराउंड, बेझल लेस डिझाइन, ४० W डॉल्बी ऑडिओ स्टिरिओ बॉक्स स्पीकर, २ जीबी रॅम, १६ जीबी ROM, ड्युअल बँडसह डॉल्बी व्हिजनच्या स्पोर्टसह येतो. ४३ इंचाच्या QLED टीव्हीची किंमत २६,९९९ रुपये आहे.
थॉमसन वॉशिंग मशीन
थॉमसन कंपनीने वॉशिंग मशीन देखील लॉन्च केले आहे. यामध्ये पाण्याचा पुनर्वापर, ९०० आरपीएम फंक्शनिंग, डिजिटल कंट्रोल डिस्प्ले, ऑटोमॅटिक imbalance करेक्शन, ऑटोमॅटिक पॉवर सप्लाय कट ऑफ, टब क्लीन, वॉटर रिसायकल यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.वॉशिंग मशीनमध्ये गंज लागून नये म्हणून प्लास्टिक बॉडी देण्यात आली आहे. शक्तिशाली मोटर, काचेचे झाकण आणि अन्य फीचर्स देण्यात आले आहे. या नवीन वॉशिंग मशीनच्या किंमती १३,९९९ रुपयांपासून सुरु होतात.
फ्लॅश सेल
थॉमसन कंपनीला १३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १३० मिनिटांच्या फ्लॅश सेलची घोषणा केली आहे. टीव्ही आणि वॉशिंग मशीनच्या सर्व नवीन सिरीजमधील प्रॉडक्ट्स आज फ्लिपकार्टवर लॉन्च केले जाणार आहेत.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thomson launch tv and washing machine series india flipkart flash sale check price and features tmb 01