सध्या व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामवर एका फीचरचा खूप उपयोग केला जातो तो म्हणजे ‘जिफ’ चा (gif). तुमच्या मनातील भावनादेखील या मजेशीर जिफच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त करू शकता. त्यामुळे अतिशय छोट्या आकाराच्या व काही सेकंदांच्या या गमतीशीर क्लिप सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. या ‘जिफ’ क्लिप कोणत्याही वेब ब्राऊजर, संगणक तसेच कोणत्याही स्मार्टफोनवर चालवता येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यांचा आकार कमी असल्याने त्या पटकन डाऊनलोड होतात. तर याच पार्श्वभूमीवर तुमच्या आवडत्या युट्यूब व्हिडीओचा ‘जिफ’ फाइल कशा बनवायच्या याचे काही टूल्स आपण पाहणार आहोत.

तुम्ही पुढील तीन टूल्सचा उपयोग करून तुमच्या युट्यूब व्हिडीओचे रूपांतर जीआयएफ (GIF) मध्ये करू शकणार आहात.

जिफी (GIPHY) :

GIPHY इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय वेबसाइट्सपैकी एक आहे, जी तुम्हाला युट्यूब आणि Vimeo चे व्हिडीओ जीआयएफमध्ये (GIF) रूपांतरित करू देते. व्हिडीओव्यतिरिक्त हे तुम्हाला फोटोमधून जीआयएफ आणि स्टिकर्सदेखील तयार करून देईल. पण, या वेबसाईटचा वापर करणाऱ्या युजर्सना सर्वप्रथम त्यांचा ईमेल आयडी वापरून साइन अप करणे आवश्यक आहे.

१. GIPHY या वेबसाइटवर जा आणि तेथील क्रिएट या बटणावर टॅप करा.
२. तुमच्यासमोर एक पेज येईल, तिथे तुमच्या आवडीच्या युट्यूब व्हिडीओची कॉपी केलेली युआरएल (URL) पेस्ट करा आणि एंटर दाबा.
३. आता एक नवीन विंडो तुमच्यासमोर येईल. तिथे तुम्ही व्हिडीओ ट्रीम करू शकाल आणि तुम्हाला व्हिडीओमधील कोणता भाग (पार्ट) जीआयएफमध्ये रूपांतर करायचा आहे ते निवडा.
४. Continue या बटणावर क्लिक करा आणि प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करा.
५. तसेच तुम्ही या जीआयएफमध्ये तुमच्या आवडीचे इफेक्ट्ससुद्धा देऊ शकता.
६. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ‘Continue to Upload’ किंवा डाउनलोड बटण दाबा. त्यानंतर तुम्हाला एक नवीन स्क्रीन दिसेल, जिथे तुम्ही टॅग ॲड करू शकता, सोर्स युआरएल जोडू शकता किंवा तुमच्या अल्बममधील एखादा जीआयएफदेखील जोडू शकता.

जिफरन (GifRun) :

फक्त जीआयएफ बनवण्यासाठी जर तुम्हाला ईमेल आयडी वापरून साइन अप करायचे नसेल तर GifRun वापरून पाहा.

१. फ्री-टू-युज सेवेचा वापर करून जीआयएफ GIF बनवण्यासाठी युजर्सना Gifrun.com वर जावं लागेल. तिथे दिसणाऱ्या एका वरच्या पट्टीवर तुम्हाला युट्यूब व्हिडीओ लिंक पेस्ट करावी लागेल.
२. स्क्रीनवर उजव्या बाजूला जीआयएफ हे बटण दाबा आणि काही वेळ प्रतीक्षा करा.
३. प्रोसेस पूर्ण झाल्यावर नवीन जनरेट झालेल्या जीआयएफची रुंदी, फ्रेम रेट निवडा आणि मजकूर लिहा. तुम्ही ते त्याच विंडोमधून डाउनलोडसुद्धा करू शकणार आहात.
४. पण, ज्या वापरकर्त्यांना जीआयएफचा वेग आणि लूप प्रकार बदलायचा आहे, त्यांना GifRun मध्ये विनामूल्य खात्यासाठी साइन अप करावे लागेल.

हेही वाचा…बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, देशात येतोय Vivo चा दोन रंगांत जबरदस्त अन् स्वस्त स्मार्टफोन; किंमत फक्त…

जिफिट (GIFit) :

जर तुम्हाला जीआयएफ तयार करण्यासाठी वर दिलेल्या वेबसाइट वापरायच्या नसतील, तर गूगल क्रोम, मायक्रोसॉफ्ट एड्जसारख्या Chromium-आधारित ब्राउझरसह कार्य करणारा ‘GIFit’ वापरून पाहा. युट्यूब व्हिडीओवरून जीआयएफ तयार करण्याचा हा सर्वात जलद आणि बेस्ट पर्याय आहे. पण, इथे जीआयएफला इफेक्टस देण्यासाठी खूप कमी पर्याय उपलब्ध आहेत.

१. GIFit डाउनलोड केल्यानंतर सगळ्यात आधी युट्यूब व्हिडीओ ओपन करा; ज्याचे तुम्हाला जीआयएफमध्ये रूपांतर करायचे आहे. स्क्रीनच्या उजवीकडे तुम्हाला GIFit बटण दिसेल.
२. तर व्हिडीओचा जीआयएफ तयार करण्यासाठी त्याची सुरुवात, शेवट कुठून करायचा आणि त्याचा फ्रेम दर आणि जीआयएफची गुणवत्ता निवडा.
३. प्रक्रिया झाल्यावर लाल ‘GIFt!’ बटणावर टॅप करा. काही सेकंद प्रतीक्षा करा आणि तुम्हाला त्याच स्क्रीनवर नवीन जनरेटेड जीआयएफ डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल.

हे तीन पर्याय (टूल्स) वापरून तुम्ही युट्यूब व्हिडीओचे जीआयएफमध्ये रूपांतर करू शकता.