सोशल मीडियावर असे अनेक ॲप्स आहेत. ज्यांच्या माध्यमांसातून घरबसल्या अनेकांशी संवाद साधणे शक्य होते. यातच व्हॉट्सॲपमध्ये मित्र,मैत्रिणी ऑनलाईन आहेत का हे पाहून त्यांना मेसेज करणं, त्यांच्याशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधने, तर शॉपिंगला गेल्यावर कपडे निवडण्यास त्यांची मदत घेणेही सोपे होते. पण, हे सर्व करण्यासाठी आधी ती व्यक्ती ऑनलाईन आहे का हे सुद्धा आपल्याला चॅटमध्ये जाऊन तपासावे लागते. पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.

इन्स्टाग्राममध्ये एखादा युजर ॲक्टिव्ह असेल तर त्याच्यासमोर एक हिरव्या रंगाचा ॲक्टिव्ह लोगो दिसतो आणि एका आडव्या रांगेत ॲक्टिव्ह इन्स्टाग्राम युजर्सची यादी देखील दर्शवतो. तर आता असंच काहीस व्हॉट्सॲपमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप तुम्हाला इतर युजर्स “ऑनलाइन” आहेत का हे रीअल टाइममध्ये दाखवते जेव्हा तुम्ही त्यांचे चॅट उघडता. पण, आता नवीन ॲप उपडेटमध्ये तुम्हाला वैयक्तिक चॅटमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. तुमच्या संपर्कांममध्ये कोण कधी ऑनलाइन आहे हे जाणून घेण्यासाठी व्हॉट्सॲप तुमच्यासाठी एक जलद मार्ग घेऊन घेत आहेत .

हेही वाचा…२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’

लोकप्रिय व्हॉट्सॲप अपडेट ट्रॅकर वेबसाइट WABetaInfo ने ॲपच्या इंटरफेसमध्ये ‘Recently ऑनलाइन’ नावाचा एक नवीन टॅब शोधला आहे ; जो तुम्हाला ऑनलाइन असणाऱ्या लोकांची यादी दाखवेल. तसेच ही बाबा लक्षात घेणं महत्वाचे आहे की, फक्त मर्यादित संख्यांचे युजर्स या यादीत दर्शविले जातील.म्हणजेच ज्यांनी व्हॉट्सॲपवर स्वतःचा लास्ट सीन (Last seen) हाईड (Hide) करून ठेवला असेल त्यांचा मात्र या यादीत समावेश होणार नाही. तर लवकरचं हा फीचर लाँच होईल आणि युजर्स कोण, कधी ऑनलाईन होतं हे सहज पाहू शकतील.