युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI पेमेंट्स (UPI Payments) हा आजकाल डिजिटल व्यवहाराचा सर्वात सोपा मार्ग बनला आहे. याद्वारे कोणतीही व्यक्ती सहजपणे कुठेही पेमेंट करू शकते. ही पेमेंट पद्धत डिजिटायझेशनला चालना देण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरते आहे. या पद्धतीत आपण काही सेकंदात पैसे ट्रान्सफर करू शकतो. त्यामुळे आता तुम्ही क्रेडिट कार्डद्वारेही UPI पेमेंट करू शकता. युपीआय पेमेंटमुळे रोख रक्कम बाळगण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तथापि, वाढत्या ऑनलाईन व्यवहारांमुळे सायबर क्राईमचा धोका देखील तितकाच वाढला आहे. whatsapp स्कॅम, पार्ट टाइम जॉबचा स्कॅम आणि मुव्ही स्कॅम सारख्या ऑनलाईन घोटाळ्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये युपीआय पेमेंट्सचा देखील समावेश आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, २०२१-२२ वर्षांमध्ये युपीआय फसवणुकीची ८४,००० प्रकरणे समोर आली होती. २०२०-२१ मध्ये ७७,००० प्रकरणे नोंदवली गेली होती. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, २०२२-२३ या वर्षामध्ये ९५,००० पेक्षा जास्त फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत. एका वर्षाच्या अंतरामध्ये याची संख्या जवळजवळ दुप्पट झाली आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.

हेही वाचा : UPI पेमेंट मध्येच अडकू नये म्हणून काय करावे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

TOI (टाइम्स ऑफ इंडिया) च्या एका रिपोर्टमध्ये दिल्ली पोलिसांच्या आकडेवारीची माहिती देत खुलासा करण्यात आले की, २०२१ मध्ये ५,५७७ तक्रारींच्या तुलनेत २०२२ मध्ये ११,७१७ तक्रारी दाखल झाल्या होत्या. पोलिसांनी सांगितले, युपीआयशी संबंधित झालेल्या फसवणुकींमध्ये स्कॅम करणारे पीडितांना त्यांच्या फोनवर रिमोट असिस्टंट सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगतात. एखादी पीडित व्यक्ती जशी त्यांच्या जाळ्यामध्ये अडकते, तसे सायबर क्राईम करणारे त्यांच्या फोनवर कंट्रोल मिळवतात आणि त्यांच्या ई -वॉलेटवर देखील कंट्रोल मिळवतात.

युपीआय फसवणुकीपासून कसे सावध राहावे ?

सायबर क्राइम करणारे पैसे पाठवण्यासाठी किंवा त्यासाठी रिक्वेस्ट पाठवण्यासाठी पीडितांना त्यांचा ओटीपी शेअर करण्यास सांगतात. मात्र प्रत्येक युपीआय फ्रॉडमध्ये स्कॅमकरणारे युपीआय पिन किंवा ओटीपी क्रमांकच मागतात. महत्वाचे म्हणजे यूपीआय पेमेंट हे सुरक्षित आहे. मात्र तुमचा युपीआय पिन हा एक कॉन्फिडेन्शियल पिन आहे जो कधीच कोणाबरोबर शेअर करता कामा नये.

स्कॅमपासून कसे वाचावे ?

१. जर का कोणी तुम्हाला चुकून पैसे पाठवले आहेत असे सांगितले तर त्या व्यक्तीची योग्य ओळख तपासावी. तसेच त्यांनी दिलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापासून सावध राहावे.

२. कधीही आपला युपीआय पिन कोणाबरोबर शेअर करू नये.

३. कोणतेही युपीआय पेमेंट करण्याआधी त्या व्यक्तीची ओळख तपासावी. ज्याच्याबरोबर तुम्ही व्यवहार करणार आहात. कधी कधी स्कॅम करणारे आपण ओळखीचेच व्यक्ती असल्याचे समोरच्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतात.

हेही वाचा : एका महिन्यापेक्षा जास्तीची वैधता देणारा BSNL चा ‘हा’ रिचार्ज प्लॅन पाहिलात का? जाणून घ्या

४. काही कालावधीनंतर सतत आपला युपीआय पिन चेंज करावा.

५. युपीआय पेमेंट्ससाठी सार्वजनिक वायफायचा वापर करणे टाळावे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upi fraud cases 95 thousand in 2022 how to protect payment cyber crime check details tmb 01
First published on: 31-05-2023 at 12:23 IST