vi launched 2999 rupees plan with unlimited calling and 850 gb bulk data | Loksatta

‘VI’ने लाँच केला नवीन वार्षिक प्लान, अमर्यादित कॉलिंगसह मिळणार ८५० जीबी BULK DATA, जाणून घ्या इतर लाभ

व्हीआयने (व्होडाफोन आणि आयडिया) अमर्यादित लाभांसह नवीन वार्षिक प्रिपेड प्लान सादर केला आहे.

‘VI’ने लाँच केला नवीन वार्षिक प्लान, अमर्यादित कॉलिंगसह मिळणार ८५० जीबी BULK DATA, जाणून घ्या इतर लाभ
(Photo-indianexpress)

VI launched 2999 rupees plan with : व्हीआयने (व्होडाफोन आणि आयडिया) अमर्यादित लाभांसह नवीन वार्षिक प्रिपेड प्लान सादर केला आहे. या प्लानची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. टेलिकॉमटॉकच्या अहवालानुसार, या प्लानमध्ये ८५० जीबी बल्क डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि व्हीआयचे लाभ ३६५ दिवसांपर्यंत मिळतात.

मिळतील हे लाभ

कॉलिंगच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, या प्लानमध्ये अमर्यादित लोकल किंवा एसटीडी कॉल्स करता येणार आणि दररोज १०० एसएमएस पाठवता येणार. ८५० जीबी डेटा संपल्यानंतर कंपनी प्रति एमबी डेटावर ५० पैसे आकारेल. १०० एसएमएस संपल्यानंतर कंपनी युजरकडून लोकल एसएमएससाठी १ रुपये आणि एसटीडी एसएमएससाठी १.५ रुपये आकारेल. प्लानमध्ये रात्री १२ ते पहाटे १२ अमर्यादित डेटा, व्हिआय मुव्हिज आणि टीव्हीचा अ‍ॅक्सेस हे अ‍ॅडेड बेनेफिट्स मिळतील

(व्हॉट्सअ‍ॅपमधून महत्वाचा फोटो, व्हिडिओ डिलीट झाला? असे परत मिळवा)

इतर प्लान्स

१) २८९९ रुपयांचा प्लान

या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि रोज १.५ जीबी डेटा ३६५ दिवसांपर्यंत मिळेल. अ‍ॅडेड बेनेफिट्समध्ये बिंज ऑल नाईट बेनेफिट, विकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाईट्स आणि व्हीआय मुव्हीज आणि टीव्ही अ‍ॅक्सेसचा समावेश आहे.

२) ३०९९ प्रिपेड प्लान

हा देखील ३६५ दिवसांचा प्लान असून त्यामध्ये अमर्यादित कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि २ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये बिंज ऑल नाईट बेनेफिट, विकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाइट्स, व्हीआय मुव्हीज आणि टीव्ही अ‍ॅक्सेस या बेनेफिट्सचा समावेश आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 18:57 IST
Next Story
माकड करतंय टायपिंग, त्याच्या मेंदूमध्ये बसवलीय चिप… काय आहे एलॉन मस्क यांच्या डोक्यात?