Vivo ही एक चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. विवो कंपनीने आज (१ मार्च) रोजी आपली Vivo V27 ही सिरीज लॉन्च केली आहे. विवो कंपनीने या सिरीज अंतर्गत ३ स्मार्टफोन म्हणजेच Vivo V27, Vivo V27 Pro बाजारात लॉन्च केले आहेत. हा लॉन्चिंग इव्हेंट तुम्ही कंपनीच्या you tube चॅनलवर पाहू शकणार आहात. विवोच्या या सिरीजमधील स्मार्टफोन्सचे फीचर्स आणि किंमत याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Vivo v२७ pro या फोनमध्ये तुम्हाला ६.७ इंचाचा हाय रिझोल्युशन डिस्प्ले मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर मिळणार आहे. तर दुसरीकडे vivo v २७ या फोनमध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 7200 हा प्रोसेसर मिळणार आहे. Vivo V27 pro या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा , ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा सेटअप मिळणार आहे. वापरकर्त्यांना यामध्ये सेल्फी व व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी ५० मेगापिक्सलचा इतका कॅमेरा मिळणार आहे. vivo च्या या स्मार्टफोन्समध्ये ग्राहकांना लग्नासाठी वेडिंग स्टाईल पोर्ट्रेट कॅमेरा फिल्टर्स मिळणार आहेत. यासह नाईट फोटोग्राफीसाठी ऑरा लाईट सपोर्ट उपलब्ध असणार आहे. ज्यामुळे तुम्ही फ्लॅशलाईटच्या मदतीने रात्रीही चांगले फोटो काढू शकता.

हेही वाचा : लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या फीचर्स

काय आहेत किंमती ?

Vivo V27 हा फोन दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इन्टर्वल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही ३२,९९९ रुपये इतकी आहे. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही ३६,९९९ रुपये इतकी आहे. तसेच कंपनीने या सिरीजमध्ये Vivo V27 Pro हा फोन लॉन्च केला असून , ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत ही ३९,९९९ रुपये इतकी आहे. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही ४२,९९९ रुपये इतकी असणार आहे.

इतकेच नाही तर कंपनी या स्मार्टफोन्सवर ग्राहकांना ३,००० रुपये डिस्काउंट आणि २,५०० रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. HDFC, ICICI आणि Kotak mahindra बँकांच्या कार्डवर देखील डिस्काउंट मिळत आहे. कंपनीने Vivo V27 आणि Vivo V27 Pro साठी प्री-बुकिंग सुरू केले आहे. तुम्ही हे फोन्स Flipkart किंवा विवोच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकणार आहात. Vivo V27 Pro ची विक्री ६ मार्च तर Vivo V27 या फोनची विक्री २३ मार्चपासून सुरु होणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivo launch v27 series in vivo v27 and vivo v27 pro with night photography feature tmb 01