WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून वापरकर्ते एकमेकांशी संवाद साधू शकतात. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या हजारो वापरकर्त्यांना मेसेजिंग App मध्ये प्रवेश करण्यात समस्या येत होत्या. थोडक्यात व्हॉट्सअ‍ॅप सेवा डाउन झाली होती. मात्र हजारो वापरकर्त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये प्रवेश करण्याबद्दल समस्या नोंदवल्यानंतर आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट Downdetector.com नुसार व्हॉट्सअ‍ॅप कनेक्टिव्हिटीची समस्या पुन्हा सुरळीत करण्यात आल्याचे मेटा प्लॅटफॉर्म्सने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आम्ही परत आलो, गप्पा मारून आनंदी आहोत! ” WhatsApp ट्विटरने अकाउंटने एक पोस्ट केली आहे. मेटाच्या स्टेटस डॅशबोर्डनुसार, कंपनीने यापूर्वी सांगितले होते की, ”WhatsApp वर येणारे मेसेज आणि मेसेज डिलिव्हर होण्यात” समस्या येत आहेत. अखेर काही तासांनी मेसेजिंग प्लॅटफॉर्म सेवा सुरू झाली आहे. याबाबतचे वृत्त reuters ने दिले आहे.

हेही वाचा : WhatsApp ने आणले मोठे अपडेट; आता नंबर सेव्ह न करताच अनोळखी व्यक्तीशी करता येणार चॅट

डाउनडिटेक्टरच्या मते , एका क्षणी अमेरिकेमध्ये मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये समस्या येत असल्याच्या ३७ हजारांपेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. डाउनडिटेक्टर हे आपल्या प्लॅटफॉर्मवर वापरकत्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी आणि अनेक सोर्सेसकडून परिस्थितीचा रिपोर्ट एकत्रित करून आउटेजचा मागोवा घेते.

या दरम्यान, इंग्लंडमध्ये १,७७,०० पेक्षा जास्त वापरकर्त्यांनी WhatsApp मध्ये येत असलेल्या समस्या नोंदवल्या आणि भारतात १५,००० वापरकर्त्यांनी मेसेजिंग App वापरताना समस्या येत असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp down globally outage thousand of users meta said disruption resolved check details tmb 01