व्हाट्सअ‍ॅप हे एक सोशल मीडिया प्लँटफॉर्म आहे. आपल्या रोजच्या जीवनात व्हाट्सअ‍ॅपचे महत्व खूप आहे. मेटाच्या मालकीचे असलेले व्हाट्सअ‍ॅप हे आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणत असते. ज्यामुळे वापरकर्त्यांना व्हाट्सअ‍ॅप वापरणे अधिक सोपे होते. यामध्ये जर तुम्ही कॉलिंगसाठी व्हाट्सअ‍ॅप वापरत असाल तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण व्हाट्सअ‍ॅप लवकरच WhatsApp कॉलिंग शॉर्टकट फिचर लाँच करण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : WhatsApp वर ‘लाईव्ह लोकेशन’ शेअर करायचे आहे?, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

कॉल रेकॉर्डिंग आणि नेटवर्कची समस्या टाळण्यासाठी वापरकर्ते अजूनही WhatsApp कॉलिंग वापरतात. या नवीन फीचरनंतर वापरकर्त्यांना व्हाट्सअ‍ॅप कॉलिंगसाठी वेगळी सुविधा मिळणार आहे. व्हाट्सअ‍ॅपच्या सर्व आगामी फीचर्सबद्दल माहिती देणाऱ्या WABetaInfo या साइटने या नवीन फीचरची माहिती दिली आहे.WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp चे नवीन कॉलिंग शॉर्टकट फीचर अॅपसोबत इंटिग्रेट केले जाऊ शकते. व्हाट्सअ‍ॅप कॉलिंग शॉर्टकट फीचरमध्ये यूजर्सना सिंगल टॅपवर कॉल करण्याची सुविधा मिळणार आहे.

यासोबतच वापरकर्ते त्यांच्या कॉन्टॅक्टसना अ‍ॅक्सेस करू शकतात आणि एका व्यक्तीला कॉल करण्यासाठी सेट करू शकतात. यासोबतच वापरकर्ते त्यांच्या कॉन्टॅक्टसना अ‍ॅक्सेस करू शकतात आणि एका व्यक्तीला कॉल करण्यासाठी सेट करू शकतात. म्हणजे वापरकर्ते सिंगल टॉपमध्ये कॉलिंगचा आनंद घेऊ शकणार आहेत. व्हाट्सअ‍ॅपच्या नवीन अपडेटनंतर हे फिचर वापरता येणार आहे. मात्र व्हाट्सअ‍ॅपने या फिचरबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp is likely to soon launch features like wwhatsapp calling shortcuts for users tmb 01