WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून आपण एकमेकांशी चॅट, व्हिडिओ कॉल्सद्वारे संवाद साधू शकतो. यामध्ये तुम्हा अनेक फीचर्स वापरायला मिळतात. तसेच आपल्या वापरकर्त्यांना हे प्लॅटफॉर्म सहज वापरता यावे म्हणून नवनवीन फीचर्स सादर करत असते. आताही व्हाट्सअॅप एक नवीन फीचर घेऊन आले आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना व्हाट्सअॅप वापरणे आणखीन सोपे होणार आहे. हे फिचर कोणते आहे आणि हे कसे वापरावे हे जाणून घेऊयात.
व्हाट्सअॅपने आणलेल्या नवीन फीचरमध्ये वापरकर्त्यांना एक नवीन अनुभव मिळणार आहे. या फीचरद्वारे वापरकर्ते कोणत्याही फोटोमधून टेक्स्ट कॉपी करू शकणार आहेत. Whatsapp च्या बातम्यांवर, नवीन फीचरवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo च्या माहितीनुसार, कंपनीने iOS वापरकर्त्यांसाठी WhatsApp चे नवीन व्हर्जन नवीन फीचरसह लॉन्च केले आहे. या फीचरद्वारे iOS वापरकर्ते आता फोटोवर लिहिलेला मजकूर कॉपी करू शकणार आहेत. जरी हे फिचर पहिल्यांदा iOS वर देखील उपलब्ध होते, परंतु आता WhatsApp ने आपल्या प्लॅटफॉर्मवर देखील ते अॅड केले आहे. ज्यामुळे वापरकर्ते आता थेट अॅपमधूनचच टेक्स्ट कॉपी करू शकतील.
हेही वाचा : २०२३ मध्ये व्हॉट्सअॅपचे ‘हे’ नवे फीचर्स येणार; जाणून घ्या काय आहे विशेष…
WhatsApp हे जगातील कोणत्याही मेसेजिंग अॅपमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. भारत देशात याचे ४० कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. याची मालकी मेटा कंपनीकडे आहे. कंपनी आपल्या वापरकर्त्यांना अधिक चांगला अनुभव मिळावा म्हणून नवनवीन फीचर्स लॉन्च करत असते.
या नवीन फिचरमधून iOS वापरकर्ते आपल्या व्हाट्सअॅपवरून एखाद्या फोटोवर लिहिलेला टेक्स्ट डिलीट किंवा कॉपी करण्यास इच्छुक असल्यास तुम्हाला यासाठी एक पर्याय मिळणार आहे. तुम्ही या पर्यायाचा वापर करून टेक्स्ट डिलीट किंवा कॉपी करू शकता. याआधी मेटाच्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये स्टिकर मेकर टूल आणि व्हॉईस अपडेट फीचर्स सुरू करण्यात आले आहेत. या अंतर्गत वापरकर्ते स्टिकर्स बनवण्यासोबतच त्यांचा आवाज रेकॉर्ड करू शकतात आणि ते त्यांच्या व्हाट्सअॅपवर स्टेट्स म्हणून ठेवू शकतात.