WhatsApp हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आपण यावरून एकमेकांशी संवाद साधू शकतो. व्हिडीओ कॉल, फोटो शेअर करून एकमेकांशी बोलू शकतो. आपले फोटो स्टेट्सला ठेवू शकतो. याची मूळ कंपनी मेटा आहे. याचे सीईओ मार्क झुकरबर्ग आहेत. कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स लॉन्च करत असते. आता मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी Mac वापरकर्त्यांसाठी एक नवीन घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपने Apple च्या मॅक कॉम्प्युटरसाठी एक अ‍ॅप लॉन्च केले आहे. कंपनीचे हे अ‍ॅप लॉन्च करण्यामागचा उद्देश हा सध्या मार्केटमध्ये अग्रगण्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअर अ‍ॅप्सपैकी एक असलेल्या झूमशी स्पर्धा करणे आहे. मॅकसाठी नवीन व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप वापरकर्त्यांना ८ मेंबर्ससह व्हिडीओ कॉलमध्ये आणीन ३२ मेंबर्सना ऑडिओ कॉलमध्ये सभागी होण्याची परवानगी देते. मेंबर्स ग्रुप कॉल सुरु झाल्यानंतर देखील यामध्ये सामील होऊ शकतात असे व्हॉट्सअ‍ॅपचे म्हणणे आहे. याबाबतचे वृत्त The Indian Express ने दिले आहे.

हेही वाचा : iPhone 15 सिरीजच्या लॉन्चिंगची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार स्पेशल इव्हेंट

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या इन्स्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनेलवर पोस्ट केली. “मॅकसाठी नवीन व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप लॉन्च करत आहे. व्हिडीओनवर ८ लोकांना आणि ऑडिओवर ३२ लोकांना ग्रुपवर कॉलमध्ये सहभागी होता येईल.” व्हॉट्सअ‍ॅपने विंडोजसाठी डेस्कटॉपसाठी देखील अ‍ॅप सादर केले आहे. मॅक आणि विंडोज दोन्ही डेस्कटॉप अ‍ॅपमध्ये तुमच्या डिव्हाइसवर तुमचे कॉल आणि चॅट्सचे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन समाविष्ट आहे.

मॅकवर WhatsApp कसे डाउनलोड करायचे?

१. सर्वात पहिल्यांदा व्हॉट्सअ‍ॅपच्या वेबसाइटवर जावे.

२. वरील बाजूस उजव्या कोपऱ्यात असलेल्या हिरव्या बटणावर क्लिक करावे.

३. तुम्हाला डाउनलोडसाठी तीन पर्याय दिसतील. अँडॉईड , iOS आणि मॅक. यातील मॅक पर्यायाखाली असलेल्या डाउनलोड बटणावर क्लिक करावे.

४. डाउनलोड वर क्लिक केल्यानंतर डाऊनलोडिंग सुरू होईल. ते पूर्ण झाल्यानंतर फाईलवर क्लिक करावे.

हेही वाचा : Reliance Jio ने ‘या’ कारणासाठी बंद केला ११९ रूपयांचा प्लॅन, स्वस्त प्लॅनसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रूपये

५. तुमच्या अ‍ॅप्लिकेशन फोल्डरमध्ये हिरवी व्हॉट्सअ‍ॅप फाइल ड्रॅग आणि ड्रॉप करावी.

६. त्यानंतर तुम्ही WhatsApp अ‍ॅप पाहण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन फोल्डर उघडू शकता. ते चालवण्यासाठी त्यावर क्लिक करावे.

७. सुरुवात करण्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करावे किंवा एक नवीन अकाउंट सेट करावे.

मॅकसाठी अधिकृत WhatsApp अ‍ॅप आता अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमध्ये उपलब्ध असेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp launch news app mac users support 8 and 32 people video and audio calls tmb 01