व्हॉट्सअॅप हे एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावरून वापरकर्ते एकमेकांशी संवाद साधू शकतात. आपले फोटो, व्हिडीओ आणि अन्य गोष्टी एकमेकांसह शेअर करू शकतात. कंपनी देखील iOS आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट्स घेऊन येत असते. तसेच कंपनी काही काळानंतर अनेक डिव्हाइसला सपोर्ट करणे देखील थांबवते. कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे की, जे फोन अँड्रॉइड OS 5.0 आणि त्यावरील चालत नसलेल्या स्मार्टफोन्सला २४ ऑक्टोबरपासून सपोर्ट देणे बंद करणार आहे. सर्वात जुने आणि सर्वात कमी वापरल्या जाणाऱ्या फोनमध्ये WhatsApp चा सपोर्ट मिळणे बंद होणार आहे असे कंपनीचे म्हणणे आहे.
जर का तुमचा स्मार्टफोन OS 5.0 किंवा त्यावर चालत नसलेल्या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला तुमचा फोन अपग्रेड करणे आवश्यक आहे. व्हॉट्सअॅपचा सपोर्ट असण्यासाठी वापरकर्त्यांचे अँड्रॉइड स्मार्टफोन्स OS 4.1 आणि त्यापेक्षा वरील व्हर्जनवर चालणारे असणे आवश्यक आहे. तसेच iOS १२ आणि त्यापुढील व्हर्जनवर चालणारे आयफोन्स तसेच KaiOS 2.5.0 आणि त्यावरील व्हर्जनवर चालणारे फोन ज्यात जिओफोन आणि जिओफोन २ चा समावेश होतो. हे सर्व निकष पूर्ण असणाऱ्या डिव्हाइसमध्येच आता WhatsApp चा सपोर्ट मिळणार आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp stop working support android iphone smartpones after 24 october check all details tmb 01