आपण सगळेच निवांत वेळ असेल तर इअरफोन्स लावून मोबाइलवर गाणी ऐकतो. पण, या दरम्यान एखाद्या व्यक्तीचा कॉल आला तर हे गाणं स्वतःच बंद होऊन मग कॉल स्वीकारला जातो. पण, जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, तुम्हाला एखाद्याचा कॉल आला तर तुमची फोनमध्ये लावलेली गाणी बंद होणार नाही, तर तुमचा यावर विश्वास बसेल का? तर मेटाच्या मालकीचे व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी असंच काहीतरी भन्नाट फिचर घेऊन आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘स्क्रीन शेअर फिचर’ असे या फिचरचे नाव आहे. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबाबरोबर व्हिडीओ कॉलवर संवाद साधत असताना तुम्हाला गाणं शेअर करण्याचा आणि स्क्रीनवर लाईव्ह गाणं प्ले करण्याचा पर्याय दिला जाईल, जेणेकरून व्हिडीओ कॉलमध्ये उपस्थित व्यक्तींनाही गाणं ऐकू जाईल. व्हॉट्सअ‍ॅप मेसेजिंगद्वारे लवकरच हे फिचर अपडेट केलं जाईल. नवीन फिचर बीटा आवृत्तीद्वारे येऊ शकते.

मेटाच्या मालकीचे व्हॉट्सअ‍ॅप अगदीच हटके फिचर घेऊन येत आहेत. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना इतर व्यक्तींबरोबर स्क्रीन शेअर करण्यास आणि एकत्र गाणं ऐकण्याची परवानगी देते. तर हे स्क्रीन शेअर फिचर गाण्यांना ऑडिओपुरते मर्यादित करत नाही आणि तुम्ही संगीत व्हिडीओदेखील समोरच्या युजर्सबरोबर शेअर करू शकता.

हेही वाचा…येणार नवीन फीचर! फेसबुकवरच नाही तर ‘या’ अ‍ॅपवरसुद्धा होणार व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस शेअर…

व्हॉट्सअ‍ॅप हे फिचर फक्त आयफोन युजर्ससाठी उपल्बध करून देणार आहे, तर स्क्रीन शेअर फिचर कसे वापरायचे हे हे पाहू.तुम्ही नेहमीप्रमाणे तुमच्या मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबाबरोबर व्हिडीओ कॉल सुरू करा. कॉल चालू झाल्यावर स्क्रीनच्या तळाशी तुम्हाला फ्लिप कॅमेरा या पर्यायाच्या बाजूला स्क्रीन शेअर आयकॉन दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्ही व्हिडीओ कॉलवर संवादा आधारे युजर ऑडिओ आणि व्हिडीओ स्वरूपात गाणी ऐकण्याचा आनंद लुटू शकता.

हे फिचर वापरण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप काही अटी ठेवत आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कॉलदरम्यान कॅमेरा चालू ठेवणे आवश्यक आहे. तसेच जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅप ऑडिओ कॉल लावला, तर हे फिचर काम करणार नाही. व्हॉट्सअ‍ॅप सध्या फक्त आयफोन वापरकर्त्यांसाठी या फिचरची चाचणी करत आहे. तसेच स्क्रीन शेअर हे फिचर अद्याप तरी Android वापरकर्त्यांसाठी आणले जाईल की नाही याची माहिती कंपनीने दिलेली नाही आहे. लाखो अँड्रॉइड वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅपवर असल्याने अपेक्षा आहे की, लवकरच अँड्रॉइड युजर्ससाठीदेखील हे फिचर लाँच केलं जाईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp users can soon hear music that can be on during video calls asp
First published on: 08-12-2023 at 13:10 IST